शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

संघर्षमय नेतृत्वाचे वय वैचारिक वारसदार .....खासदार श्री रवींद्र पाटील चव्हाण

           
             गुलाब शेख 
       ‌‌.     उपसंपादक 
राजकारणी नेता म्हणलं की आपल्या सर्वांच्या नजरे भोवती एक चित्र उभा राहत ते म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी वाटेल तसे प्रयोग करणारे आणि सत्तेत आल्यावर जणू त्या पदाची  नशा चढली आहे अश्या भावनेत वावरणे .. 
मग ते वागण्यात बोलण्यात ते सातत्याने दाखवणे पोठात एक ओठावर एक अस चित्र उभा राहत किंवा अस चित्र सर्रासपणे सध्या वर्तमान काळात परिस्थितीत आपल्या पाहायला भेटतं. 
अस जरी असल तरी या राजकारणात सगळे नेते हे एक सारखेच असतात अस नाही ..काही नेते हे या सगळ्या समाज भावनेत रुजलेल्या विचारापेक्षा आपल्या नावाचा नेतृत्वाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेगळा वलय निर्माण करतात .
          असंच एक *नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील सामाजिक व्यवस्थेतील संवेदशील  नेतृत्व म्हणजे खासदार रवींद्र पाटील चव्हाण.* ज्या व्यक्तिमत्त्वान कदाचित कळत्यावयापासून आपल्या घरात सत्ता पाहिली असेल . घरात आमदारकी पहिली बरेच राजकीय पदे सुद्धा पाहिले असतील . पण या नेतृत्वाच्या व्यक्तिमत्त्वात कधी सत्तेची हवा गेली नाही . आपल्या नेतृत्वातून ज्या नेतृत्वाने राजकारणाची परिभाषा  राजकीय नेत्यांना बघण्याचे जे परिमान समाज व्यवस्थेत आहेत  ते सगळे बदलून राजकारणात सुद्धा सामाजिक संवेदनशील पणा जागृत आहे हे ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून व नेतृत्वातून सिद्ध केलं ..
                राजकारणामध्ये तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण ठेवत असलेला संवाद सामाजिक व्यवस्थेच्या प्रश्नाविषयी असणार भान या नेतृत्वाच वेगळे पण आहे. राजकारण हे सत्तेसाठी करावं सत्ता आल्यानंतर त्या सत्तेच्या बेधुंद लहरी मध्ये वाटल तसा प्रवास करावा ही विचारधारा राजकारणामध्ये  आपण सरासपणे पाहतो. पण या नेतृत्वाने या सगळ्या गोष्टी बदलल्या मी समाजव्यवस्थेचा राजकीय नेत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या स्वकर्तुत्वाने या नेतृत्वाने हळूहळू बदला आहे. असं म्हणतात की राजकारणी सत्ता पद प्रतिष्ठा आली की ते समाजव्यवस्थेतल्या माणसांशी भावनिकतेची माणुसकीची  किनार सोडून ते सत्तेच्या पदाच्या आणि प्रतिष्ठेच्या आभासी जगात आपली वाटचाल ठेवतात . **पण रवींद्र पाटील* मात्र हा सगळा समज बाजूला करत आपल्या राजकीय जीवनाच्या परिपटलावरचा प्रवास सातत्याने करत आहेत.
सत्ता ही सामान्य माणसाच्या हितासाठी असते हे वैचारिक बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले असावेत या नेतृत्वाने ते बाळकडू वर्तमान परिस्थितीमध्ये स्वकर्तुत्वाने सामाजिक जीवनाशी जोडून एक नवा आदर्श निर्माण केला.
         सकारात्मक विचारांनी राजकारणाच्या परिपटलावर एक आदर्शवत विचार निर्माण करणार नेतृत्व म्हणजे *रवींद्र पाटील चव्हाण.*
अस म्हणतात की राजकारण हे सज्जन माणसाचं नव्हे पण हा सुद्धा विचार आपल्या नेतृत्वातून ज्यांनी खोडून काढला खर तर सज्जन माणूस कोणाला म्हणावा याबाबत संत तुकाराम महाराजांच्या ओळी आठवल्या. *सज्जन तोची ओळखावा  शब्द सत्य जो मानी* .अस निर्मळ *स्वच्छ चारित्र्यसंपन्न नेतृत्व म्हणजे खासदार रवींद्र पाटील चव्हाण. पदावर बसल्यानंतर माणसाला अनेक कान तयार होतात असं म्हणतात* पण हा 
गैरसमज सुद्धा ज्यांनी खोडला आणि सांगितलं ठणकावून . सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता* .हा प्रगल्भ विचार मनाशी बाळगून नांदेड जिल्ह्याचा राजकारणात एका उगवत्या सूर्यासारखा चमकणाऱ्या आणि चंद्रासारख्या शितल मनाच्या नेतृत्वाचा उदय होतो आहे . सरते शेवटी संत तुकाराम महाराज यांच्या एका ओळीने हा लेखनाचा प्रपंच आटोपता घेतो *चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग.
       *तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना .* 
अस राजकारणातील *सर्वगुणसंपन्न  चारित्र्यसंपन्न नेतृत्व* *म्हणजे रवींद्र पाटील चव्हाण..*
प्रतिनिधी..
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
गुलाब शेख

Post a Comment

Previous Post Next Post