शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश

मुखेडचे माजी आमदार श्री. अविनाश घाटे यांच्यासह नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. अ‍ॅड. संदीप पाटील चिखलीकर, नांदेडचे जिल्हाप्रमुख श्री. माधव पावडे, नांदेडचे तालुकाप्रमुख श्री. गणेश शिंदे, जिल्हा संघटक श्री. नेताजीराव भोसले, महानगरप्रमुख श्री. पप्पू जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. बालाजी शिंदे, युवती सेना जिल्हाप्रमुख श्रीम. रोहिणी कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य श्री. साहेबराव धनगे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख श्री. संतोष पावडे, युवासेना शहर प्रमुख श्री. अभिजीत भालके, नांदेडचे ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्री. योगेश संभाजी शिंदे, दर्यापूरचे सरपंच श्री. विलास सूर्यवंशी तसंच भोकरचे श्री. दादाराव ढगे आदी मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांच्या भक्कम साथीनं पक्ष अजून मजबूत होईल आणि जनसेवेत तुमचा सुद्धा मोलाचा सहभाग राहील, असा विश्वास व्यक्त करतो.

Post a Comment

Previous Post Next Post