शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

माता रमाबाई आंबेडकर यांची 127 वी जयंती विविध गावात उत्साहाने साजरी

माता रमाबाई आंबेडकर यांची 127 वी जयंती विविध गावात उत्साहाने साजरी 
  पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज सरोदे   
 भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुका महिला व पुरुष विभाग यांचे संयुक्त विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती घोडेगाव व अवसरी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी तालुका अध्यक्ष महेशभाऊ वाघमारे व मीनाक्षीताई वाघमारे हे होते. माता रमाबाई आंबेडकर म्हणजे त्याग प्रतीक होय. संपूर्ण आयुष्यात बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाव लागत होत त्यांना लागणार सर्व गोष्टी रमाबाई काम करून पुरवत असत.समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आपली मुले दगावले तरी बाबासाहेब यांची कधीही तक्रार केलेली नाही. अशा या मातेला त्यांच्या जयंती निमित्ताने कोटी कोटी प्रणाम असे महिला विभाग तालुका अध्यक्ष मीनाक्षीताई वाघमारे यांनी अभिवादन करताना सांगितले.तालुकाध्यक्ष महेशभाऊ वाघमारे यांनी माता रमाबाई यांचे जिवन पट सांगत असताना उपस्थित लोक भावनिक होऊन रडू लागले.संपूर्ण आयुष्यात त्याग व बलिदान सोडून त्यांचे नशिबी दुसरे काही नव्हते. प्रसंग सांगत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून राऊंड टेबल कॉन्फरन्स १९३२ सार्‍या जगाला चकित करून अस्पृश्यता माणुसकी या हक्काचा झगडा पेटवून यशस्वी करून मुंबईला आले असता त्यांच्या स्वागतासाठी भरपूर समाज जमला होता त्यात रमाबाई पण होत्या बाबासाहेबांच्या गळ्यात हार पडत होते आणि ते दृष्य पाहून माता रमाई ह्यांचे मन उचंबळून येत होते आणि त्यांचे डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. हे सर्व पाहून बाबासाहेबांच्या सुवर्ण स्नेही पाठिराखे (जनता पत्राचे संपादक सहस्रबुद्धे) यांनी अचूक टिपले की हार घालताना सर्वांच्या नजरा बाबासाहेब यांच्या चेहऱ्याकडे होत्या पण माता रमाई यांची नजर त्यांच्या पायाकडे होती. ध्यन ते बाबासाहेब आणि धन्य त्या माता रमाई!अश्या ह्या मातेला कोटी कोटी प्रणाम असे तालुकाध्यक्ष महेशभाऊ वाघमारे यांनी आपल्या मार्गदर्शन करते वेळेला सांगितले .यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुक्याचे वतीने सर्वांना जयंती साजरी करण्याचे सांगितले होते त्यानुसार तालुक्यातिल बर्याच गावत जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी गौतम रोकडे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दोन्ही विभागाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पूनम वाघमारे, सीता वाघमारे, सुनीता वाघमारे, जया भालेराव, नीलिमा वाघमारे, कोमल वाघमारे, आराध्य वाघमारे, नेहल वाघमारे, मौलि वाघमारे दिपाली वाघमारे, काव्या वाघमारे, गणेश वाघमारे, सचिन ढोणे,नरेश कसबे, पंकज सरोदे, विकास मोरे, तानाजी अस्वरे, आतिष ढोणे, गणेश भालेराव, राजू शेवाळे, किरण खरात, सुरेश शिंदे, संजय अंकुश, सुनील अंकुश, शुभम साळवे, यश फाले,गौतम खले,अक्षय साळवे, अनिल अभंग, सागर गायकवाड, भाग्यश भालेराव, दीपक रोकडे आदी मान्यवर विविध ठिकाणी उपस्थित होते. अशी माहिती पंकज सरोदे समता सैनिक यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post