जिजामाता महाविद्यालयात मुलींना स्वसंरक्षण व कायद्याचे धडे
शिवाजी पवार इंदापूर तालुका प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व जिजामाता महाविद्यालय सराटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत निर्भय कन्या कार्यशाळा नुकतीच पार पडली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री आप्पासाहेब जगदाळे यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
निर्भय कन्या कार्यशाळेचे उद्घाटन सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड.ऐश्वर्या देशपांडे, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री मच्छिंद्र वीर जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश लिपारे विद्यार्थी विकास अधिकारी मयूर पिसे आय क्यू एस सी समन्वयक प्रा विजय गेंड यांच्या उपस्थितीत पार पडले.
ऍड ऐश्वर्या देशपांडे यांनी विचार व्यक्त करताना महिलांना संरक्षण देण्यासाठी विविध प्रकारचे कायदे करण्यात आले आहेत, तरीसुद्धा महिलांवर अत्याचाराच्या घटना कमी झाल्या नाहीत. महिलांनी कुठल्याही प्रकारचा अत्याचार सहन न करता त्याला सामोरे जायला हवे. कायद्याचा वापर करून संकटाना तोंड द्यायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन केले
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश लिपारे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींनी निर्भय होण्यासाठी सकारात्मक विचार अंगीकारून मुलींनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता व कोणत्याही दबावाखाली न येता येणाऱ्या संकटाचा कायद्याचा आधार घेऊन सामना करावा असे सांगितले
दुपार सत्रामध्ये मुलींच्या आरोग्य या विषयावर बोलताना डॉ.तृप्ती फडे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्याचे महत्व पटवून दिले मुलींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असल्याने मुलींनी आहार व व्यायामाकडे लक्ष देऊन शरीर सुदृढ करावे असाही सल्ला दिला.
मुलींनी शारीरिक सुदृढतेप्रमाणेच मानसिक सुदृढ होणे गरजेचे आहे. मानसिक कणखरता कोणत्याही संकटाशी सामना करू शकते असे मानसशास्त्र समुपदेशक सौ.हेमा फडे विचार मांडले. तसेच कराटे प्रशिक्षक म मा श्री बिपिन थिटे यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले.
विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.मयुर पिसे यांनी प्रस्ताविक करताना निर्भय कन्या अभियानाच्या उद्दिष्टांची माहिती दिली.
तसेच कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद प्रा रमेश इंगळे प्रा अरुण जाधव प्रा मल्हारी मगर प्रा मुकुंद सोनवणे प्रा राहुल आसबे प्रा मुस्तफा सय्यद प्रा रोहित जरे प्रा संदीप निकम प्रा प्रीतम खांडेकर प्रा प्रतीक्षा चव्हाण प्रा रोहिणी अनपट प्रा रूपाली वाघमोडे प्रा प्रज्ञा गिरमे प्रा ऋतुजा उबाळे प्रा स्नेहा पारेकर प्रा अरुणा कोकाटे प्रा तृप्ती झगडे प्रा शैला पवार प्रा कल्याणी बोडके प्रा शितल जगताप तसेच शिक्षकेतर कर्मचारी गुंडेराव त्रिगुळे, सुवर्णा ढोले, वैशाली भोसले यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.रोहिणी अनपट व प्रा.वैष्णवी देशमाने यांनी केले, तर आभार प्रा.अरुणा कोकाटे यांनी मानले.
Post a Comment