शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन संपन्न

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन संपन्न

मुखेड :-
          येथील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष वार्षिक युवक शिबीर मौजे बेरळी खु.येथे अतिशय थाटात उद्घाटन संपन्न झाला . प्रस्तुत शिबीर दि.09 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे . उद्घाटन दि.10 फेब्रुवारी रोजी घेण्यात आले .राष्ट्रीय सेवा योजना ही सामाजिक जबाबदारी स्वीकारुन समर्पित भावना जपणारे व्यासपीठ आहे . वर्तमान काळात अनेक संधी युवकांना उपलब्ध आहेत . या संधीचे सोने करण्यासाठी आपल्या मनात ईच्छा असणे महत्त्वाचे आहे . राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून स्वयंसेवकांना कर्तृत्ववान बनण्यासाठी मोलाची मदत मिळते असे प्रतिपादन संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी प्रतिपादन केले .
             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरभद्र शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष ओंकारअप्पा मठपती , उद्घाटक नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक मल्लिकार्जुन करजगी , प्रमुख पाहुणे धर्माबादच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. शिवाजीराव पटवारी , विभागीय समन्वयक प्रा.संजीव डोईबळे , धर्माबादच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. संभाजी मनुरकर , मज्योफुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , व्यासपीठावर जि.प.शाळेचे मुख्याध्यापिका सौ.के.ए.सय्यद , सहशिक्षक जगन्नाथ राठोड , थगनारे उपस्थित होते . प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे , सूत्रसंचालन स्वयंसेविका कु.निकिता पवळे व कु.ऋतुजा डाकळे यांनी केले .
             मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पूजन व सत्कार यावेळी करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांना प्रोफेसर डॉ. पटवारी यांनी मार्गदर्शन करताना स्पर्धेच्या युगात युवक टिकण्यासाठी मेहनत घ्यावे . रासेयो ही संकल्पना आयुष्यात सर्वांगीण विकासासाठी कार्य करते . विद्यार्थी , श्रोत्यांच्या आग्रहाखातर " चिचुंद्री " नावाची कथा सादरीकरण करून आल्हाददायक वातावरण निर्माण केले . डॉ. मनुरकर यांनी बालविवाह प्रतिबंध कायद्याबरोबरच सामाजिक जबाबदारी मोलाची आहे . सामाजिक समतोल राखण्यासाठी बालविवाह प्रतिबंध कायदा कार्य करते . युवकांना जबाबदारीची जाणीव राष्ट्रीय सेवा योजना विभाग करून देते . कष्टाच्या जोरावर विद्यार्थ्यांना , कार्यक्रमाधिकारी यांनी अनेक पुरस्कार मिळवू शकतात असे सांगितले .
        प्राचार्य डॉ. अडकिणे यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याचा सदुपयोग जीवनात करून घेतला पाहिजे . विशेष वार्षिक युवक शिबीर म्हणजे स्वयंसेवकांसाठी मिळालेली सुवर्ण संधी आहे असे विचार मांडले . उदघाटक डॉ. करजगी यांनी गावातील सोयी सुविधा , सर्वेक्षण , जनजागृती , नवीन शैक्षणिक धोरणाची रँली , चावडी वाचन , पर्यावरण संरक्षण करण्यासाठी उपाय योजना , सुशिक्षित बेरोजगार युवकांचे उद्बोधन , कँशलेस व्यवहार , डिजिटल साक्षरता , युथ फाँर माय भारत अँड युथ फाँर डिजीटल लिटरसी इत्यादी विषयावर कार्य करण्याची गरज व्यक्त केले . उपप्राचार्य प्रा.डोईबळे यांच्या मार्गदर्शन प्रसंगी शिबीर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिले . विद्यार्थी आपल्यातील होणाऱ्या सकारात्मक बदलाकडे लक्ष देऊन जीवनात आनंद निर्माण केला पाहिजे असे विचार व्यक्त केले .
        अध्यक्षीय भाषणात ओंकारअप्पा मठपती यांनी विद्या विनयेन शोभते . विनयशीलता अंगीकार करून सर्वोत्तम मिळणारी सेवा ही राष्ट्रीय सेवा योजनेतून पूर्ण करावी . बदलत चाललेली पध्दती ही स्वीकार करायला हवे पण भारतीय संस्कृती कधीच विसरू नका .गावातील विकास कार्यात सहभागी होऊन संस्था व महाविद्यालयाचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्याचा मोलाचा सल्ला दिले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.डाँ.बी.एस.केंद्रे , प्रा.एस.पी.शिंदे , प्रा.पी.आर.गिरी , देविदास आईनवाड , बेरळी खु सरपंच रेणुका भागवत तोटेवाड , उपसरपंच सिध्दांत कांबळे , सदस्य सुनील अरगीळे , पो.पा.वाल्मिकी गिरबनवाड , दत्ता बादेवाड , दत्ता पा.इंगोले , शंकर सोनाळे , गणेश उक्कादेवडे ईत्यादींनी प्रयत्न केले . बहुसंख्येने रासेयो स्वयंसेवक , स्वयंसेविका , नागरिक , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती .
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
उपसंपादक गुलाब शेख

Post a Comment

Previous Post Next Post