अखेर सदस्या स्नेहल जंगम अपात्र
महाराष्ट्र पोलीस न्यूज संपादक चांगदेव काळेल
सातारा; सैदापूर ग्रामपंचायत सदस्या स्नेहल जीवन जंगम अपात्र ठरले आहेत जात वैधता प्रमाणपत्र यासाठी वाढीव कालावधी देऊन सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र करण्यात आले आहे
गेल्या कित्येक महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात या प्रकरणाची सुनावणी झाले. याबाबतचा तक्रारी अर्ज सौ संजीवनी धनवे व विक्रम पवार यांच्या तक्रारीचा अर्ज अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केला आहे.
याबाबत सविस्तर; स्नेहल जंगम यांना 2021 मध्ये आरक्षित प्रवर्गातून सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून देण्यात आले होते.
जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा कालावधी उलटूनही त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने 24 जुलै 2024 रोजी याबाबतची तक्रार सैदापूर ग्रामस्थांच्या वतीने संजीवनी धनवे व विक्रम पवार यांनी तक्रार केली. या तक्रारीबाबत जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे सुनावणी झाली. सुनावणी अखेर विंहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जंगम यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी सातारा यांनी दिला त्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पद निरर्ह ठरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे सरपंच गट अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे.
Post a Comment