सरकार प्रतिष्ठान च्या वतीने भांबुर्डी गावात शिवजयंती साजरी
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी आप्पा पवार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सरकार प्रतिष्ठानच्या वतीने भांबुर्डी गावामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा श्री प्रसाद गेंड भांबुर्डी गावचे माजी सरपंच श्री दादासाहेब वाघमोडे, डोडला डेअरीचे मॅनेजर ज्ञानेश्वर गेंड, श्री. नारायण गेंड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरकार प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून भांबुर्डी गावातील सुकन्या कुमारी रोहिणी बाळासाहेब चव्हाण मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रसाद गेंड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या एकाच जातीचे आणि धर्माचे नसून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या आराध्य दैवत आहेत. त्यामुळे भांबुर्डी गावामध्ये सर्व जाती व धर्मातील लोक एकत्र येऊन सालाबाद प्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करतो. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिव विचार घराघरात पोहोचवण्याचं काम सरकार प्रतिष्ठानच्या वतीने केलं जाईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सानवी विजय गेंड या बाल चिमुकलीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून स्वराज्य निर्मिती, मावळ्यांचे बलिदान, स्त्रियांवरील अत्याचार करण्याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण, तसेच रयतेचा राजा शिवछत्रपती यावर शिव विचार मांडले. तसेच चिरंजीव विनायक गोरड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पोवाडा सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी सोहळा समिती २०२५ चे अध्यक्ष नितीन नरळे, उपाध्यक्ष युवराज केसकर, सचिव महेश गेंड श्री राजाराम गेंड श्री बापू ढेंबरे श्री बाळासाहेब गेंड अर्जुन नरळे सुधीर गेंड विशाल नरळे करण नरळे हर्षद गेंड,अशोक ढेंबरे,नामदेव गेंड,आदित्य गेंड अनिकेत गेंड तसेच भांबुर्डी गावातील ग्रामस्थ शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय गेंड सर यांनी केले तर आभार युवराज केसकर यांनी मानले.
Post a Comment