शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

देवळाली प्रवरा नगर पालिकेने नागरिकांसाठी स्वर्गरथाचे लोकार्पण केले

देवळाली प्रवरा नगर पालिकेने नागरिकांसाठी स्वर्गरथाचे लोकार्पण केले
नागरिकांची गैरसोय दूर

             देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांना अंत्ययात्रेसाठी इतर साधनांचा वापर करावा लागत असल्याने नगर पालिकेने नागरिकांची गैरसोय दूर करण्याकरिता देवळाली प्रवराच्या नागरिकांसाठी शिवजयंतीच्यादिनी स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले.
               देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील मयत व्यक्तीच्या अत्यंयात्रेसाठी स्वर्गरथ उपलब्ध नसल्याने राहुरी येथून रथ बोलविण्यात येत होता. यासाठी शहराची लोकसंख्या व वाढता विस्तार बघता ही गरज ओळखून मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी शहरासाठी स्वर्गरथ देऊ करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार हा स्वर्गरथ बनविण्यात आला. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी हा स्वर्गरथ लोकार्पण करण्यात आला.
           प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे,ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब कदम, उद्योजक ऋषभ लोढा, रामेश्वर तोडमल, पत्रकार रफिक शेख, कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर ,दिवाबत्ती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल,वसुली विभागाचे सारंगधर टिक्कल,आरोग्य निरीक्षक कृष्णा महांकाळ, अरुण कदम,राजेंद्र कदम,अश्विनी भांगरे, अमोल पंडित,गोरख भांगरे,राजेंद्र कदम, बाळासाहेब भोंडगे , नंदू शिरसाठ,अमोल कांबळे, राजेंद्र हारगुडे, विकास गडाख, सोमनाथ सूर्यवंशी,निळकंठ लगे आदिंसह  कर्मचारी उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आल्हाट सह नानासाहेब उंडे राहुरी
लोकोशन देवळाली प्रवारा

Post a Comment

Previous Post Next Post