शहा ग्लोबल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी आप्पा पवार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती इंदापूर शहरातील शहा ग्लोबल स्कूल मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
शहा ग्लोबल स्कूलमध्ये मंगळवार ( दि. १८ फेब्रुवारी ) रोजी सकाळी १० वाजता, श्रीमती मालतीताई शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त वैशाली शहा, संस्थेचे विश्वस्त मुकुंदशेठ शहा, शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरतशेठ शहा, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अंगद शहा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
त्यानंतर के टू वर्गातील विद्यार्थ्यांनी पाळणा गावून शिवजन्मोत्सव साजरा केला. तसेच के टू वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वराज्य शपथ सोहळा सादर केला. नर्सरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी महाराजांविषयी भाषण सादर केले. प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी आई व मुलाचे आतुर नाते कसे असावे, याचे सादरीकरण केले. के वन च्या विद्यार्थ्यांनी महाराजांविषयी गीत सादर केले. तसेच विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे दिली. आलेल्या पालकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. शेवटी शिवगर्जनेने अगदी जल्लोषात कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी स्कुलच्या शर्व राऊत या विद्यार्थ्याने, महाराजांच्या किल्ल्यांची अवस्था बघा, जसे ढासळलेले बुरुज, अस्वच्छता हे सगळं बघून महाराजांना काय वाटत असेल? असा सवाल करीत, गडकिल्ल्यांची स्वच्छता व निगा राखणे ही आपली जबाबदारी आहे. असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे निवेदन शिक्षिका श्रुतिका खटावकर यांनी केले तर स्कुलमधील सर्व शिक्षिका, पालक, कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment