पेण शहरात पोलिसांचा रूट मार्च
आज दिनांक १२/०३/२०२५ रोजी आगामी येणारे सण होळी,धूलिवंदन ,गुडीपाडवा ,रमजान ईद अनुषंगाने पेण शहरात रुट मार्च तसेच दंगा काबू योजना आयोजित करण्यात आलेला असुन सदरचा दंगा काबू व रुट मार्च करीता ६ अधिकारी , २८ अंमलदार, तसेच आर.सी.पी.प्लाटुन वडखळ ३० जवान हजर होते. सदरचा रुट मार्च रुट हा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पेण येथून १६ .५० वा सुरू होवून तो -डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक -छत्रपती शिवाजी महाराज चौक -भगवानदास चौक - खाटीक मोहल्ला -सार्वजनीक विद्यालय (पा.का.चौक)- राजु पोटे मार्ग -एस.टी स्टॅड - नगरपालीका नाका- उपविभागीय कार्यालय पेण येथे १७.३० वा. येथून शांततेत पार पडला आहे.
पेण शहरांमध्ये पोलिसांचा रूट मार्च
पेण शहरांमध्ये शांतता रहावी व सर्व सण शांततेत पार पडावे यासाठी पेण पेण पोलिसांनी शहरांमध्ये रूट मार्च केला कुठेही शहरांमध्ये हिंसा होऊ नये व आपल्या सणांना होळी पाडवा धुलीवंदन रमजान हे सर्व सण शांततेत व्हावेत यासाठी पेन पोलीस सातत्याने सतर्क आहेत शहरांमध्ये कुठेही दंगे फसाद होऊ नये कुठल्याही सणाला गाळपोट लागू नये यासाठी पेन पोलीस सातत्याने याची दक्षता घेत आहेत याकरता आज पेन शहरांमध्ये रूट मार्च काढण्यात आला
Post a Comment