दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना परंडा पोलीसांनी अटक केली. परंडा प्रतिनिधी -हारून शेख
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना परंडा पोलीसांनी अटक केली. दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाले.आरोपींकडून लोखंडी कत्ती व इतर हत्यारे जप्त करण्यात आली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.14 मार्च रोजी रात्री देवगाव रस्ता कात्राबाद शिवार येथे काही जण दिपक गरड यांच्या शेता जवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परंडा पोलीसांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली असता पाच जणांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत बसली असल्याचे दिसून आले. यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन जण फरार झाले.तालुक्यातील सचिन इतापे, तुषार शिंदे दोघे रा लोणी ,लक्ष्मण पवार रा.भोत्रा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर फरार आरोपी चैतन्य पांडूरंग शेळके रा.भोत्रा व बार्शी तालुक्यातील शेंद्री येथील वैभव गोरख कोडलिंगे हे दोघे अंधाराचा फायदा घेत फरार झाले. ही कामगिरी उपविभागीय अधिकारी गौरीशंकर हिरामण पोलीस, उपनिरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुर्वे , विशाल खोसे, नितीन गुंडाळे यांनी आरोपीचा पाठकलाग करून पकडण्यात यश आले.वरिल तीन्ही आरोपी यांना अटक करून.आरोपींकडून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.याप्रकरणी परंडा पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment