जगाच्या कल्याणासाठी उपवास करणे हा रमजान महिन्याचा प्रमुख उद्देश- भरतशेठ शहा
इंदापूर तालुका प्रतिनिधी शिवाजी पवार
पवित्र रमजान महिन्यातच हजरत मुहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेने ज्या परमेश्वराच्या साक्षात्कारासाठी हजरत मुहम्मद पैगंबरांनी तहान, भूक, दुनियादारी या साऱ्या गोष्टींना तिलांजली देऊन परमेश्वराची इमानेइतबारे इबादत केली, तो परमेश्वर याच महिन्यात त्यांना प्रसन्न झाला. त्यांची ईश्वरसेवा खऱ्या अर्थाने कबूल झाली. पैगंबरांची इबादत स्वतः साठी नव्हतीच मुळी. ती इबादत होती लोककल्याणासाठी, समस्त मानवमुक्तीसाठी. या महिन्यापासूनच पवित्र कुराणाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याला सुरुवात झाली. ईश्वराच्या प्रसन्नतेची, विशालतेची साक्ष देणारा महिना म्हणूनही या महिन्याचे आगळेवेगळे स्थान अबाधित आहे. माणसाला त्याच्या भल्याबुऱ्याची, पाप-पुण्याची जाणीव करून देणाऱ्या या महिन्यात उपवास करायचे असतात.
*रहिमतुल लिल आलमीन म्हणजे जगाचे कल्याण होवो. त्यांना जर फक्त मुस्लीमांचे कल्याण म्हणजे*
*रहिमतुल लिल मुस्लीमीन असे म्हणता आले असते परंतु तसे न म्हणता आलमीन म्हणजे जगातील सर्व मानव जातींचे कल्याण होवो असे पवित्र धर्म ग्रंथात म्हटले आहे - असे मत भरतशेठ शहा यांनी व्यक्त केले.*
उपवास म्हणजे आत्म्याचे, आचारविचारांचे शुद्धीकरण होय. माणसाच्या या आचार-विचारांच्या शुद्धीकरणाची ही निकड कितीतरी वर्षापूर्वी सांगण्यात आली आहे. आजही त्याची नितांत गरज भासते. यावरून पैगंबरांच्या दूरदृष्टीची कल्पना सहजगत येऊ शकते. रमजानमधील रोजा म्हणजे सहरीपासून इफ्तारपर्यंत निव्वळ अन्न-पाण्यापासून दूर राहून भुकेची जीवघेणी यातना सहन करणे एवढेच नव्हे तर आखून देण्यात आलेली कुंपणे, बंधने, मर्यादा यांचे तंतोतंत पालन या महिन्याच्या वर्तुळात राहून करणे, असे मत कर्मयोगी सह. साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष मा. भरतशेठ शहा यांनी व्यक्त केले, ते सालाबाद प्रमाणे, आरशादभाई सय्यद मित्र परिवार आयोजित इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी, आरशादभाई सय्यद मित्र परिवार, गटनेते कैलास कदम, मा. उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, राष्ट्रवादीचे नेते संदिपान कडवळे, सुनील तळेकर, अशोक चव्हाण, अमोल माने, गणेश महाजन, इनायत अली काझी,
जकिरभाई सय्यद, हाजि नवाज बागवान, आयान जमादार, उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रियाज बागवान, इरशाद बागवान, अन्सार बागवान, फिरोज पठाण, जहिर मोमीन, पप्पु बागवान, रिहाण बागवान, असिफ शेख, यांची मोलाची साथ लाभली असे मत आयोजक आरशद सय्यद यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम दर्गाह मस्जिद चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
Post a Comment