धुळे जिल्हा प्रतिनिधी
संकेत बागरेचा
सामाजिक कार्यकर्ते श्री बापूसो. गुलाब सिताराम बागुल यांचे पुतणे व भटाईदेवी माध्यमिक विद्यालय खंडलाय बु. ता. जि. धुळे येथील लिपिक, आमचे सहकारी सौ. सुषमा श्री प्रविण सिताराम बागुल यांचे सुपुत्र चि. वेदांत याने जवाहर नवोदय विद्यालय धुळे येथील प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. तसेच या अगोदर गावातील आमचे सन्मित्र सौ संगीता श्री महारु शेनपडू पाटील यांचे चि. जयदीप याचाही जवाहर नवोदय विद्यालय धुळे येथे परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेश निश्चित झाला होता, साधारण आमच्या गावातून दुसरा विद्यार्थी हा जवाहर विद्यालयात प्रवेशित झाला. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत सुद्धा माणूस आपल्या पाल्याला चांगल्या प्रकारे घडवू शकतो, उदाहरण म्हणजे "शुद्ध बीजापोटी फड रसाळ गोमटी" उक्तीप्रमाने माणसाचा दर्जा उंचावला जातो. गावाचे नाव उंच स्थानावर बालमित्रांच्या सहकार्याने उंचावले गेले. म्हणून ग्रामपंचायत गटप्रमुख आबा पगारे यांनी पुढाकार घेऊन लहान मोठ्या तरुणांना अभ्यासात उत्साह वाढवा, त्यांच्या पाठीवर प्रेरणेची थाप देऊन स्फूर्ती मिळावी या प्रेरणेने त्यांचा सत्कार आणि सन्मान करणे आपले कर्तव्य आहे असं समजून गेल्या काही वर्षांनी मा.आमदार कुणालबाबा पाटील यांच्या धर्मपत्नी सौ अश्विनी कुणाल पाटील यांच्या हस्ते आमच्या साक्षीने चि. जयदीप याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला होता. त्याचप्रमाणे या वर्षी चि. वेदांत आणि त्याचे माता पिता यांचा कौटुंबिक सत्कार व सन्मान करण्यासाठी ग्रामपंचायत गटप्रमुख श्री आबा पगारे त्यांची धर्मपत्नी सौ प्रा. साविता पगारे, ग्रामपंचायत सदस्या सखुबाई माळी, सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ कोळी, लोटन निकम, सुरेश कोळी, धनराज बागुल, कमलाकर देवरे, अर्जून देवरे, राजू निकम, बापु देवरे, तसेच इतर मान्यवरांच्या समवेत शाल, श्रीफळ, फुलहार, व पुस्तक देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आला.
थोडक्यात कै. अण्णासो. सिताराम गंगाराम बागुल यांना पाच मुले, वारसा असलेल्या याच पाच पांडवांचे कुटुंब आज रोजी गावात आदर्श राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बाबतीत उंचावलेलं कुटुंब म्हणून प्रसिद्ध असून, नेहमीच या कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थीची शैक्षणिक घोडदौड प्रगतशील असते. या कुटुंबातील सर्व नातवंडे उंच पदावर नोकरीला आहेत. प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक झाले आहे. एकत्र कुटुंब पद्धती कशी टिकवावी हे या कुटुंबाकडून शिकणे योग्य आहे. एकोप्याने राहून कसं कार्य करावं हे वाखाण्याजोग आहे.
Post a Comment