( माणगाव - उत्तम तांबे , रा . जि . संपादक )
अत्त दीप भव बौद्धजन मंडळ व संघमित्रा महिला मंडळ खांदाड - माणगाव या सेवाभावी मंडळाच्या विद्यमाने १४ एप्रिल २०२५ रोजी खांदाड येथे विश्वरत्न - डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला . या सेवाभावी मंडळाचे संस्थापक , ज्येष्ठ पत्रकार - उत्तम तांबे यांच्या शुभहस्ते बोधिसत्व - डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला . तर विद्यमान अध्यक्ष - विकास शिर्के यांच्या हस्ते गौतम बुद्ध चरणी पुष्प अर्पण करण्यात आले . माजी अध्यक्ष - विलास शिर्के व खजिनदार - चंद्रमणी तांबे यांच्या हस्ते उदबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली . त्यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना व धम्म वंदना घेण्यात आली . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - विलास शिर्के यांनी केले होते . या सेवाभावी मंडळाचे यावर्षी ४२ व्या वर्षात पदार्पण होत असताना , भारतरत्न - डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा एक क्रांतिकारी लढा म्हणजेच बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन - २०२५ चा देखावा सादर करण्यात आला होता . या जयंती उत्सव कार्यक्रमाला माणगाव नगरपंचायत नगराध्यक्षा - शर्मिला सुर्वे , विद्यमान नगरसेवक - कपिल गायकवाड , सुनील पवार यांची उपस्थिती लाभली होती . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी - चेतन गायकवाड , सिद्धांत तांबे , प्रबुद्ध तांबे , स्वराज तांबे , जय जाधव , आर्या शिर्के , आद्या तांबे , प्रशांत पूरारकर , श्रीयंश गायकवाड , कार्तिक पुरारकर तसेच विठाबाई तांबे , यशोदा तांबे , सपना तांबे , गौतमी तांबे , पुनम तांबे , सुमन शिर्के , नूतन शिर्के ' सुधा तांबे , नेहा तांबे, प्रभावती पुरारकर यांचे विशेष सहकार्य लाभले होते .
Post a Comment