शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मधु तारा फाऊंडेशन.जय सियाराम सेवा संस्था ट्रस्ट. धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान यांचे महा रोजगार मेळावा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न

मधु तारा फाऊंडेशन.जय सियाराम सेवा संस्था ट्रस्ट. धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान यांचे महा रोजगार मेळावा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न.
पुणे प्रतिनिधी पंकज सरोदे 
*दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन.जय सियाराम सेवा संस्था ट्रस्ट श्रीराम मंदिर.धर्मवीर शंभू राजे प्रतिष्ठान आणि* *इकविटास डेव्हलपमेंट इनेशिटिव ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित महा रोजगार मेळावा व मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर श्रीराम मंदिर काळेबोराटे नगर तुकाई टेकडी हडपसर पुणे येथे उत्साहात पार पडले.* 
*मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या नोकरी मेळावा आणि मोफत मोतीबिंदू शिबिरास*
*धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक आपला माणूस श्री मारुती आबा तुपे यांच्या हसते रिबीन कट करून आणि बारावकर काका यांच्या हसते जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून दीप प्रज्वलित करून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.* 
*या वेळी इक्विटस यांच्या आयोजनातून अनेक कंपन्यांनी रोजगार उपलब्धतेसाठी सहभाग घेतला.* 
 *ईकविटास ट्रस्टचे श्री संग्रामजी पाटील.माधुरी मुसळे मॅडम. श्री वैभव करांडे.श्री भगत सिंह. तसेच टाटा उद्योग समूहाच्या टाटा स्ट्राईव्हचे श्री वीरेंद्र सिंग.श्री किरण कदम सर यांनीही सहभाग घेतला.* 
*या वेळी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर या साठी भारतातील अग्रगण्य नेत्र रुग्णालय एच व्हि देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे.यांनी सहभाग घेतला.* 
*या वेळी असंख्य शिक्षित तरुण तरुणींनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला.तसेच अनेक वृद्ध आजी आजोबांनी नेत्र तपासणी करून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा लाभ घेतला*.
*या कार्यक्रमासाठी धर्मवीर* *शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक श्री मारुती आबा तुपे.श्रीराम मंदिराचे* *संस्थापक अध्यक्ष श्री सुरेशजी बारवकर काका.सौ.बारावकर काकी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच उत्कृष्ट नियोजन केले गेले.या नियोजनात मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री* *अनिलजी दांगडे.मधु तारा पुणे शहराध्यक्षा शारदाताई शेंडकर.श्री रुपेशजी* *देशमुख.बारावकर काकांचे नातू ची.प्रसाद यांनी कार्यक्रमाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली.* 
 *लोकहिताच्या पवित्र कार्यास आझाद रिक्षा चालक मालक संघटना पुणे संस्थापक अध्यक्ष श्री शफीक भाई पटेल.देश भरात रक्त सेवा देणारे हर्ष फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री आप्पासाहेब घोरपडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच राष्ट्रवादी वैद्यकीय कक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख राज्याचे कार्याध्यक्ष श्री निनादजी टिंमीघीरे.वात्सल्य अनाथालय संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंदजी सरोदे.आझाद रिक्षा संघटनेचे श्री मधुकरराव थोरात.दयावान संस्था लोणी काळभोर पुणे संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कवडे.तसेच हडपसर भागातील असंख्य मान्यवरांनी शिबिरास आवर्जून भेट दिली.
या वेळी सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला.
अत्यंत आनंदाच्या वातावरणात अल्पोहार.स्नेहभोजनाचा आनंद घेत उत्साहात कार्यक्रम पार पडला.
या वेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मधु तारा प्रमुखांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم