दादर गावामध्ये राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी
पेण तालुक्यातील दादर गाव या ठिकाणी राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते भैरवनाथाची यात्रा या गावांमध्ये पालखी मिरवणूक करून साजरी केली जाते पाटील कुटुंब हा वारसा आहे गेले अनेक पिढ्यापासून चालले रामा ची रामनवमी गेल्या अनेक वर्षापासून या गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पाटील कुटुंबातील जो कुठेही व्यक्ती असेल तो या दिवशी दादर गावांमध्ये येत असतो या गावाला भेट देण्यासाठी गावच्या सुपुत्र श्री अतुलदादा म्हात्रे यांनी रामनवमीनिमित्त दादर गावांमध्ये समस्त पाटील परिवार यांना भेट दिली तसेच अतुलदादा मात्रे यांचे स्वागतही केले पाटील कुटुंबाच्या वतीने गावांमध्ये तीन दिवसापासून कीर्तनाचा कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम मोठा प्रमाणात चालू होता संपूर्ण पाटील परिवार या मंदिराचं देखभाल करत आहेत त्यांच्या पूर्वजा न पासून चालू आलेली परंपरा आताची पिढी ही परंपरा सातत्याने जपत आहे इथं मोठ्या प्रमाणात महाप्रसाद भोजनदान केला जातो हजार्य संख्येने इथे भोजनदान व महाप्रसाद साठी लोकप्रसाद घेण्यासाठी येत असतात या मंदिराचे वैशिष्ट्य असं आहे जुन्या काळातील लोकांनी इथं शेतावर येऊन शेती करत असताना या मंदिराचे निर्माण केलं आणि तेव्हापासून चालत असलेली ही परंपरा या दादर गावांमध्ये पाटील कुटुंब सातत्याने करत आहेत
Post a Comment