शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती परंडा येथे उत्साहात साजरी

चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती परंडा येथे उत्साहात साजरी 

महाराष्ट्र प्रतिनिधि - हारून शेख
परंडा.दि.8 एप्रिल 2025 चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2329 व्या जयंतीच्या निमित्ताने परंडा येथील धम्मराजिका महाविहारा मध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
जगाला शांतीप्रिय धम्माचा संदेश देणारा,युद्धाच्या नरसंहारातून करुणेचा मार्ग निवडणारा चक्रवर्ती सम्राट अशोक राजा .
कलिंगच्या युद्धानंतर चक्रवर्ती सम्राट अशोका ने हिंसेचा मार्ग सोडून बौद्ध धम्म स्विकारला आणि अख्ख्या भारतातच नव्हे तर जगभर शांती,करुणा आणि समता यांचा प्रचार केला.त्याने "धम्म" हे राज्यकारभाराचे सूत्र बनवून धम्म विजय घडवून आणला.आज जेव्हा मानवता पुन्हा संकटात आहे तेव्हा चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या विचारांची,मूल्यांची आणि कार्याची आठवण होणे अत्यंत आवश्यक आहे.
चक्रवर्ती सम्राट अशोक म्हणजे,सामर्थ्य,आत्मपरीक्षण आणि परिवर्तन यांचं सर्वोत्तम उदाहरण.चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त परंडा येथे धम्मराजिका विहारामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक,क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव संयोजक समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून बाबासाहेब सदाशिव मोरे व अमरसिंह लकिबसिंह ढाका हे उपस्थीत होते.या व्याख्यानमालेसाठी अध्यक्ष म्हणून प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे हे होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा उत्तर जिल्हाध्यक्ष हनुमंत प्रतापे हे उपस्थित होते.व्याख्याते बाबासाहेब सदानंद मोरे व अमरसिंह लकीबसिंह ढाका यांनी आपले विचार व्यक्त करत असताना चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे जीवनकार्य बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांचे योगदान अहिंसेचा संदेश भारतीय लोकशाहीतील संविधानिक सम्राट अशोक यांची प्रतीके यावरती सखोल असे मार्गदर्शन केले चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा आदर्श तरुणांनी घेतला पाहिजे सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या विहार,चैत्य,स्तूप यांचा अभ्यास केला पाहिजे असे सांगितले.धम्मराजिका महाविहार परिसरामध्ये पंचशील ध्वजावंदन करून महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विहारनिर्माण समितीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार निकाळजे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य सरचिटणीस संजयकुमार बनसोडे,फुले आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के,उत्तरेश्वर ठवरे उमाकांत गोरे,मोहम्मद शेख,राहुल पवार,मुर्तुजा सय्यद,मेजर सतीश शिंदे,मारुती अलबते भारतीय बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्षा सुषमाताई निकाळजे व अश्विनीताई हवळे विचारमंचावर उपस्थित होते या व्याख्यानासाठी उपस्थित साहित्यिक तु.दा.गंगावणे, ॲड.दिलीप निकाळजे, प्रा.सुभाष मारकड,शहाजी सोलनकर,नाना काळे सिद्धार्थ उबाळे,महाविर बनसोडे,सुनिल बनसोडे,परंडा शहर व तालुक्यातील निवृत्त माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी व्याख्याते बाळासाहेब सदाशिव मोरे व अमरसिंह लकीबसिंह ढाका यांनी विहारातील वाचनालया साठी ग्रंथसाहित्य भेट म्हणून उपलब्ध करून दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्रकुमार निकाळजे प्रस्ताविक धनंजय सोनटक्के व सुषमाताई निकाळजे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी मांडले हा व्याख्यानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्रकुमार निकाळजे,प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे व धनंजय सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post