चांगदेव काळेल
सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातार---- पहिल्या दिवशी, सोमवार दि. 16 जून रोजी नागठाणे, ता. सातारा येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रवेशोत्सवासाठी पोलीसअधीक्षक तुषार दोशी, नायब तहसीलदार दयानंद कोळेकर, उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे,
बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. डी.एन वाळवेकर, महिला पोलिस अधिकारी पी.एस.आय स्मिता पाटील, विस्ताराधिकारी श्री.घोरपडे परळी बीट, नागठाणेच्या सरपंच सौ.रूपाली बेंद्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप साळुंखे, उपाध्यक्ष कविता साळुंखे व सदस्य गणेश हं. साळुंखे व सर्व सदस्य, पालक व मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ढोल ताशांच्या गजरामध्ये नवागतांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. डफळे मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे प्रथम पुस्तके देऊन स्वागत केले. श्री. खाडे सर यांनी प्रास्ताविक करून शाळेच्या शैक्षणिक प्रगती विषयी माहिती दिली.शाळेतून घडलेले विद्यार्थी शाळेचा ऐतिहासिक वारसा याबद्दल माहिती दिली. गत तीन वर्षातील शाळेचा वाढत असलेला पट, इंग्रजी माध्यमातून शाळेत आलेले विद्यार्थी याची माहिती दिली नवोदय परीक्षा सैनिक स्कूल परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा कराटे स्पर्धा यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या मुलांची माहिती दिली.सौ.विद्या पवार मॅडम व सौ.वैशाली मोरे मॅडम यांनी नवागतांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. श्री तुषार दोशी साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेच्या दरवर्षी वाढत्या पटसंख्येबाबत समाधान व्यक्त केले, सर्व मुलांना विशेष प्रोत्साहित केले"मुलं घडविण्यात शासनाच्या जिल्हा परिषद शाळांचे मोलाचे योगदान आहे"
असे मत व्यक्त केले. मुलांच्या शाळेतील पहिल्या पावलाचे ठसे घेण्यात आले. सेल्फी पॉईंट मध्ये श्री तुषार दोशी सरांनी मुलांसोबत सेल्फी घेतली. सौ. आशा ढाणे यांनी आवाहन पत्राचे वाचन केले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके गणवेश,सॉक्स,बूट व खाऊ वाटप करण्यात आला. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. आहाराबाबत दोशी साहेबांनी स्वतः आस्वाद घेऊन समाधान व्यक्त केले. प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी केंद्र शाळा नागठाणे येथील शिक्षक सौ. सविता गुरव सौ तांबोळी नसीम सौ साळुंखे अलका सौ मगर सुमती, सौ वनिता पवार, सौ खाडे सोनाली सौ वडार कविता यांनी योगदान दिले.तसेच शाळेत गतीने चालू असलेल्या विकास कामाबाबत मान्यवरांनी शाळा व्यवस्थापन समितीचे आवर्जून कौतुक केलेशाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. गणेश हंबीरराव साळुंखे यांनी शाळेचा विकास,गुणवत्ता आणि सर्वगुण संपन्न शिक्षक वर्ग यांचा सविस्तर आढावा देत उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment