शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

आर.एस.पी.शिक्षक अधिकारी श्री. संदीप गोसावी यांचे यश

        जालिंदर आल्हाट
       ‌.     अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी          
        महाराष्ट्र राज्य गृह विभाग, पोलीस व शिक्षण विभागाच्या अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संघटन नागपूर यांचे सयुक्त विद्यमाने दि. 21 मे ते 30 मे 2025 अखेर RSP शिक्षक अधिकारी प्रशिक्षण पोलीस मुख्यालय, अ. नगर येथे पर पडले. या प्रशिक्षणासाठी एकूण 90 शिक्षक अधिकारी हजर होते. या प्रशिक्षणासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळच्या केशव गोविंद विद्यालयाचे जेष्ठ व उपक्रमशील शिक्षक श्री संदीप गोसावी सर यांची निवड झाली होती.
           सदर प्रशिक्ष णामध्ये विविध विषयांचा समावेश होता. त्यामध्ये ड्रिल, वाहतूक नियंत्रण, नागरी सरक्षण, अग्निशमन सेवा, प्रथमपोचार, आकस्मिक सेवा तसेच शिस्त यांचा समावेश होता. वरील सर्व विषयांची प्रत्यक्षिके सादर करण्यात आली व आपत्कालीन परिस्थीतीत कसा बचव करता येईल व हानी कशी टाळता येईल याचे योग्य असे प्रशिक्षण देण्यात आले. शेवटी या सर्व प्रत्यकक्षिकावर लेखी परीक्षा झाली. शेवटच्या दिवशी पासिंग आऊट परेडनें मान्यवरांना सलामी देण्यात आली. यामध्ये प्रशिक्षण पूर्ण व यशस्वी पूर्ण केल्या बद्दल श्री संदीप गोसावी यांचा गोसावीसर एन सीसी: पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे, RSP संघटनेचे अद्यक्ष मा. श्री संजय शेंडे, मुख्याध्यापक संघटनेचे अद्यक्ष मा. सुनील पंडित सर, आर. एस. पी. चे नाशिक विभागाचे समादेशक मा. श्री सिकंदर शेख यांचे हस्ते प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.                सदर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी जिल्हा समादेशक मा. श्री. सोमनाथ बोतले, उपजिल्हा समादेशक मा. श्री प्रकाश मींड यांचे सह नगर तालुका RSP समादेशक श्री राजीव धस यांनी विशेष परिश्रम घेतले. ड्रिल इन्स्ट्रकटर म्हणून श्री मुसा सय्यद यांनी आपली जबाबदारी पार पाडली. या यशा बद्दल विद्यालयच्या प्राचार्या श्रीमती राणी साळवे,पर्यवेक्षक श्री श्रीनिवास खर्डे व शिक्षक प्रतिनिधी उदय गायकवाड यांनी विशेष कौतुक केले. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील पहिले RSP अधिकारी होण्याचा मान श्री गोसावी यांना मिळाला. या त्यांच्या यशा बद्दल सर्वच स्तरातून श्री गोसावी यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व संचालक मंडळानें श्री गोसावी यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्या दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post