शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंदापूर तालुक्यात दिव्यांग व वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोफत तपासणी शिबीर ...*30 ऑगस्टला शहा सांस्कृतिक भवन इंदापूर तपासणी करून होणार विविध साहित्याचे वाटप**कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन*

.              
              शिवाजी पवार 
                 इंदापूर तालुका प्रतिनिधी 

            पुणे  :  इंदापूर तालुक्यात दिव्यांग व वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोफत तपासणी शिबीर भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) व कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर अनुक्रमे (दि.३०) रोजी शहा सांस्कृतिक भवन इंदापूर आणि (दि.३१) रोजी अतिथी मंगल कार्यालय अंथुर्ण या ठिकाणी पार पडणार आहे असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

या शिबिरात ६० व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांनी आधार कार्ड, २ पासपोर्ट साईज फोटो , उत्पन दाखला किंवा पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड किंवा ग्रामसेवक अथवा सरपंच दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोफत तपासणी शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय वयोश्री अंतर्गत व्हील चेअर, व्हीलचेअर सह कमोड, काठ्या , कानाची मशीन, कंबरेचे, गुडघ्याचे, पाठीचे आणि गळ्याचे पट्टे , बसण्याची गादी, कमोड चेअर शील आदी साहित्य मिळणार आहे असेही आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

त्याचप्रमाणे दिव्यांग लाभार्थी व्यक्तींनी तपासणीसाठी येताना UDID कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड , उत्पन्न दाखला किंवा रेशन कार्ड अथवा ग्रामसेवक किंवा सरपंच दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्रे येत्न आणवीत असे आयोजकांनी कळविले आहे. तसेच या शिबिरात अस्थी व्यंग लाभार्थी व्यक्तींना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, काठी, कुबडी, कृत्रिम अवयव (हात /पाय ), सी.पी. चेअर, किमान  ४०% आणि त्यावरील दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या कर्णबधीर लाभार्थ्यांना कानाची मशीन इत्यादि साहित्य मिळणार आहे.  याबरोबरच अंध प्रवर्गातील लाभार्थी व्यक्तींना त्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ब्रेल कीट, अंध काठी, इयत्ता १० वी पासून पुढे शिक्षण घेत असलेल्या लाभार्थ्यांना स्मार्ट फोन आणि सुगम्य केन (सेन्सर अंध काठी) इत्यादी साहित्य मिळणार आहे. परंतु त्यासाठी शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेतील पुरावा / महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा बोनाफाईड सादर करणे आवश्यक आहे. 

या मोफत शिबिरात सहभागी व लाभ घेण्यासाठी आयोजकांच्या वतीने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत त्यामध्ये बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकलसाठी किमान ८०% दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे, सदरचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी बहिरा, अंध, मतीमंद नसावा व दोन्ही हात चांगले असावेत, मागील ३ वर्षात कोणताही साहित्य लाभ घेतलेला नसावा , बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल आणि स्मार्टफोन साठी मागील ५ वर्षात लाभ घेतलेला नसावा अशा सूचना करीत या शिबिराचा इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू दिव्यांग व वयोश्री योजनेतील लाभार्थी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आयोजक कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने निमंत्रण दिले आहे

Post a Comment

Previous Post Next Post