धनंजय काळे
महाराष्ट्र (प्रतिनिधी) –
भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर विधानसभा क्षेत्रातील मध्य मंडळाची नव्याने गठित कार्यकारिणी आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली. ही घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, तसेच भाजपा युवा नेते प्रवीण भैया माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भाजपच्या या नव्या पावलामुळे स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या समर्पित कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देत संघटन अधिक बळकट करण्याचा स्पष्ट संदेश पक्ष नेतृत्वाने दिला आहे.
नवगठित कार्यकारिणीच्या माध्यमातून स्थानिक विकास, जनसंपर्क आणि पक्षविस्तार यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामध्ये युवा कार्यकर्त्यांचा जोश, अनुभवी नेतृत्वाचा अनुभव आणि महिलांचा सक्रीय सहभाग यामुळे कार्यकारिणीत ऊर्जा, अनुभव आणि समावेशकतेचे संतुलन दिसून येत आहे.
लवकरच नव्युक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
या प्रसंगी भाजपा इंदापूर विधानसभा अध्यक्ष राजकुमार जठार यांनी नव्या कार्यकारिणीत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment