शिवाजी पवार
इंदापूर प्रतिनिधी
15 ऑगस्ट निमित्त आज उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे थाटामाटात भारत देशाचा 79 वा स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या क्रस्ना डायग्नोस्टिक्स सिटी स्कॅन विभागाच्याच्या वतीने *"निरोगी जीवनाचे स्वातंत्र्य जनजागृती अभियान"* राबविण्यात आले.
या अभियाना अंतर्गत जनतेला अधिक पारदर्शक, जलद, सक्षम आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व स्टाफला उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. प्रमाणपत्राचे वितरण इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ले व उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचा सर्व स्टाफ उपस्थित होता.
या कार्यक्रमावेळी निरोगी जीवनाचे महत्व पटवून देत असताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ले यांनी चांगले आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक तंदुरुस्ती नाही, तर मानसिक आणि सामाजिक कल्याण देखील आहे. निरोगी जीवनशैली जगल्याने अनेक फायदे मिळतात, जसे की दीर्घायुष्य, आजारांचा धोका कमी, ऊर्जा पातळी वाढणे आणि मानसिक स्वास्थ्य सुधारणे असे मत मांडले व मार्गदर्शन केले.
“आपले आरोग्य, आमची जबाबदारी” या ब्रीदवाक्याने क्रस्ना डायग्नोस्टिक्स सतत रुग्णांच्या चोवीस तास सेवेत कार्यरत आहे. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेली क्रस्ना डायग्नोस्टिक्सची *CT Scan* सेवा आजारांचे लवकर निदान करून उपचार प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरत आहे. हि परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची सेवा २४x७ उपलब्ध आहे.
सदर अभियान यशस्वी होण्यासाठी क्रस्ना डायग्नोस्टिक्सचे सिटी स्कॅन प्रोजेक्ट प्रमुख चिराग चोरडिया, पुणे आणि कोल्हापूर विभागाचे ऑपरेशनल मॅनेजर इजाज मुल्ला, क्लस्टर मॅनेजर बाबुराव दुबे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंदापूर उपजिल्हा सिटी स्कॅन विभागाचे इन्चार्ज प्रेम कडवळे, संदेश कांबळे, अनुज माळवदे, आफताब पटेल, प्रतीक्षा रूपनवर, वैष्णवी कोकरे आणि विजय नगरे यांनी योगदान दिले.
Post a Comment