नेताजी खराडे
दौंड तालुका प्रतिनिधी
६० वर्षाची आशिर्वादीत वाटचाल
पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संचलित मनोरमा मेमोरियल हायस्कूल शाळेचा वर्धापन दिन दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी शाळेच्या सभागृहात जल्लोषात पार पडला. ६ सप्टेंबर १९६६ स्थापन झालेल्या मनोरमा शाळेने ५९ वर्षे पूर्ण करीत हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी *भीमा पाटस सहकारी कारखाना पाटस चे माजी व्हाइस चेअरमन मा. श्री. आनंददादा थोरात* यांनी भूषवले. *संस्थेच्या बी. ओ.जी. सभासद मा. रोधा स्टॅन्ली मॅडम* यांच्या प्रमुख उपस्थितीत , संस्थेच्या संचालिका डॉ. लॉरेन्स फ्रान्सिस मॅडम, संस्थेचे चीफ ऑफ ऑपरेशन मा. अनिल फ्रान्सिस सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संपादक श्री. नातू सर,बोरीपार्धी चे सरपंच श्री. बी. डी. सोडनवर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सुचिता शिंदे यांनी अहवाल वाचन करून शाळेच्या प्रगतीच्या आलेखाचे वर्णन केले.
शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ मधील माध्यमिक शालांत परीक्षा इ. १० वी प्रथम ३ क्रमांक, स्कॉलरशिप परीक्षा पात्र विद्यार्थी, नवोदय परीक्षा पात्र विद्यार्थी, तालुकास्तरीय पारितोषिक वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी विविध उपक्रम, कृतीचे *मनोरम क्षण* असे ६० फोटो चे माहिती पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. हीरक महोत्सवी वर्षा निमित्त सर्व मान्यवरांनी शाळेला भरभरून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका सुनंदा आढाव व शीतल चोपडे यांनी केले.
Post a Comment