मुंबई - महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते अनागारिक धम्मपाल व पेरियार स्वामी जयंती आणि भय्यासाहेब आम्बेडकर स्मृतीदिन निमित्त आंदोलनाचा टप्पा 2 नुसार बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संपूर्ण भारतीय बौद्धांची मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), समता सैनिक दल, बौद्ध महासभा भिक्खु संघ आणि तमाम बुद्ध- आंबेडकर विचार धाराच्या समाज संघटन, संस्था , मंडळे यांच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 17/9/2025 रोजी सकाळी जन आक्रोश आंदोलन मोर्चा बुद्धगया महाबोधी महाविहार, महू जन्म भूमी आणि नागपूर दीक्षाभूमी या आमच्या अस्मितेच्या, स्फूर्तीच्या धारोहर मनुवादी च्या हातातून आमच्या बौद्धांच्या हातात सरकारने दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ भीमराव य आंबेडकर यांनी मुंबई मधील आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये केले. यावेळी त्यांनी पुढील तीन मागण्यांवर आपले परखड मत मांडले
1)तथागत भगवान बुद्ध यांना बुद्धत्व प्राप्तझाले ते युनेस्को ने संरक्षित केलेले जागतिक बौद्धांचे ठिकाण बोधगया महाबोधी महाविहार हे संपूर्णपणे बुद्धांना नियमन करणे साठीदेण्या ऐवजी बोधगया मंदिर अधिनियम 1949 बिहार सरकार द्वारे 9 सदस्य मध्ये केवळ 4बौद्ध सदस्य असून हा बुद्धगया मंदिर कायदा संविधानिक अधिकाराचे (अनुच्छेद 25 और 26) उल्लंघन करणारे आहे.बोधगया मंदिर कायदा 1949 हा संपूर्णपणे संविधान अनुच्छेद 13 च्या विरोधी आहे . त्यामुळे बौद्धांचे महाबोधी महाविहार चे व्यवस्थापन पूर्णपने बुद्धांना द्यावे
2)भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक, त्यांच्या जन्म स्थळ महूमध्ये निर्माण करून, मध्यप्रदेश सरकार ने महान कार्य केले आहे. मात्र या स्मारक चे व्यवस्थापन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधाराच्या विरुद्ध होत आहे.तेथे जयभीम शिवाय अन्य घोषणा दिल्या जात आहेत . त्यामुळे तेथे देश विदेश येथून आलेले लाखो भीम अनुयायी व्यथित होऊन त्यांचा आक्रोश अंतिम क्षणाला पोहचला आहे, त्याचे आंदोलन महु, इंदौर तथा देशभरमध्ये चालत आहे.या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकार ने महु जन्म स्थली के स्मारक चे संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या घटनेनुसार दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे द्यावे.
3)नागपूर दीक्षाभूमी निर्माण करण्याचे मुळ शासकीय सम्मती पत्र तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष भय्यासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या नावावर देण्यात आले होते.परंतु नंतर दीक्षाभूमी स्मारक समितीने दीक्षाभूमी वर बेकायदेशीर कब्जा केला आहे.दीक्षाभूमी वर पार्किंग च्या नावाखाली विद्रूपिकीकरण केले गेले असून त्याच्या विरोधमध्ये संविधान चौक, नागपूर मध्ये भीमसैनिका मार्फत निरंतर आंदोलन चालविले जात आहेत. त्यामुळे दीक्षाभूमी नागपूर चे विद्रूपिकीकरण दूर करून त्याचे व्यवस्थापन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडे द्यावे.
तसेच डॉ भीमराव य आंबेडकर पुढे असे म्हणाले की, आता आमच्या कक्षा वाढवाव्या लागतील मौर्य, कुशवाह, यादव हे आपलेच आहेत त्यांच्याशी संवाद साधून आपण सत्तेत येऊन आपणच आपली धरोहर संरक्षित केली पाहिजे.
यावेळी बोद्धजन पंचायत समितीचे सभापती व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, लक्ष्मण भगत आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्यावतीने मुंबई प्रदेशचे चेतन अहिरे, स्नेहल सोहनी यांनी यांनी या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा जाहीर केला.
या आंदोलनात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया, ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई कार्यालय प्रमुख अॅड. एस. के. भंडारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख राष्ट्रीय सचिव अॅड. एस.एस.वानखडे, यु जी बोराडे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) ,विलास वानखेडे(अध्यक्ष मुंबई प्रदेश), स्वातीताई शिंदे(अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला),विजय गायकवाड (अध्यक्ष ठाणे) , सुशिल वाघमारे (रायगड दक्षिण अध्यक्ष), संतोष जाधव (रायगड उत्तर अध्यक्ष),नामदेव जगताप(अध्यक्ष नवी मुंबई जिल्हा) प्रफुल्ल सुपे (पालघर जिल्हा अध्यक्ष),अनंत जाधव (झोन 5अध्यक्ष), विमलानंद कांबळे (ठाणे महानगर अध्यक्ष), मनिषा साळवे (मुंबई झोन 5) यांनी आंदोलनाची भूमिका मांडली.राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड व भिकाजी कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. संस्थेचे ट्रस्टी कॅप्टन प्रविण निखाडे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड डॉ जगदीश गवई यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोर्चाचे व्यवस्थानाचे काम समता सैनिक दलाचे डी एम आचार्य , प्रदीप कांबळे,
मोहन सावंत, वंदनाताई सावंत, वासुदेव हिवराळे , निलेश पवार , मंगेश अडसुळे, अभिजीत गरबडे इत्यादींनी केले.
या आंदोलनाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सुमारे पाच हजार जनसमुदाय आझाद मैदानावर एकवटला होता. शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण पद्धतीने हे आंदोलन पार पडले. या कार्यक्रमाला मुंबई प्रदेशचे सहा झोन, ठाणे, पालघर, नवीमुंबई, रायगडचे बौद्ध उपासक, उपासिका, पदाधिकारी, कार्यकर्ते, दलाचे अधिकारी, सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी वरील पदाधिकारी शिवाय मुंबई प्रदेशचे दयानंद बडेकर,
राजेंद्र सत्वधीर ,विलास ढोबळे , सागर गांगुर्डे,तानाजी साबळे , सुनील बनसोडे , संतोष मटकर, दिलीप लिहिणार,अनिल पहूरकर,
ए.के जाधव , अशोक जाधव, बबन तायडे,विलास खाडे, सोनाली कटारनवरे, सारिका झिमुर केंद्रीय कार्यालयचे डॉ राजेश पवार,बी. एम. कांबळे, सी. बी. तेलतुंबडे, रागिणीताई पवार,सुप्रियाताई कासारे,अनिल मनोहर महाराष्ट्र राज्याचे अशोक केदारे ,प्रशांत गडकरी ,उत्तम मगरे , रवींद्र गवई, जयवंत लव्हांडे , सुजाताताई कांबळे , छायाताई घोक्षे,सुनंदाताई वाघमारे इत्यादीनि परिश्रम घेतले.
Post a Comment