शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुणे जिल्ह्यात वंचित बहुजन महिला आघाडीच्या सचिवपदी वृषाली ताई वीरगुजर यांची निवड

                  पंकज सरोदे
        पूणे जिल्हा प्रतिनिधी 
           
            पुणे  : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, तसेच वंचित बहुजन महिला आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार आणि प्रांतिक मार्गदर्शक अंजली ताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे जिल्ह्यात महत्त्वपूर्ण संघटनात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

       वंचित बहुजन महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षा सीमा ताई भालेसईन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वंचित बहुजन आघाडी वडगाव मावळ तालुका अध्यक्ष नितीन भाऊ, महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य सचिव अनिता ताई सावळे, महाराष्ट्र राज्य सदस्या निर्मलाताई वंनशिव, तसेच पुणे जिल्हा संघटक रंजना ताई रोकडे यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला.

      या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या माजी महासचिव, धडाडीच्या कार्यकर्त्या, संघटनेशी कायम एकनिष्ठ आणि तल्लख नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृषाली ताई वीरगुजर यांची वंचित बहुजन महिला आघाडी पुणे जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना भोर व वेल्हे तालुक्यात काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

      वृषाली ताई वीरगुजर यांच्या नियुक्तीबद्दल पुणे जिल्हा अध्यक्षा सीमा ताई भालेसईन तसेच संपूर्ण पुणे जिल्हा महिला आघाडीने हार्दिक अभिनंदन केले. पुढील काळात त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी आणि महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी निष्ठेने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

     या नियुक्तीमुळे भोर व वेल्हे तालुक्यात महिला आघाडीचे कार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

 पुणे जिल्हा सचिव पदाच्या नियुक्तीबद्दल वृषाली ताई वीरगुजर यांना हार्दिक शुभेच्छा! 

Post a Comment

Previous Post Next Post