संजय गायकवाड
उरण रायगड उपसंपादक
कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाची कमाल
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करत असताना स्थानिक कामगारांना न्याय देण्यासाठी अग्रेसर असणारे कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाइम अँड जनरल कामगार संघटनेचा कामाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे
संघटनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचे काम सातत्याने सुरू आहे मग ती पगारवाढ असेल किंवा सामाजिक सुविधा दरवर्षी 14 ते 15 पगारवाढीचे करार संघटनेच्या माध्यमातून केले जातात या वर्षाचा हा 18 वा करार मे शेरॉन बायो मेडिसिन तळोजा या कंपनीतील कामगारांसाठी तब्बल 11 हजार रुपये पगार वाढीचा करार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आला
या करारनामा नुसार कामगारांना एक बेसिक पगार बोनस 3 लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी तसेच दहा लाख रुपयांची बफर पॉलिसी पर्सनल लोन 50 हजार रुपये लंच अलाउन्स 100 वरून 150 रुपये देण्याचे मान्य करण्यात आले या करारनाम्यावेळी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते श्री महेंद्र शेठ घरत कार्याध्यक्ष श्री पी के रमण सरचिटणीस वैभव पाटील तसेच मॅनेजमेंट तर्फे डीपी पालव सीईओ संदीप ओझा प्लांट हेड परीक्षित पालन मार्केट हेड माया शर्मा एचआर हेड कायदेशीर सल्लागार असिफ मुल्ला सईद मुल्ला तसेच कामगार प्रतिनिधी म्हणून रोहन कोळी महेंद्र डोंगरे अनिल डोंगरे विद्यानंद पाटील आकाश फडके महेश लहू पाटील संतोष मुंडे महेश दशरथ पाटील आदी उपस्थित होते पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते महेंद्र शेठ घरत कामगारांवर सातत्याने होणारा अन्याय अत्याचार ते मोडून काढत आहेत
व कामगारांसाठी चांगल्या पद्धतीने आज ते काम करत आहेत यामुळे महेंद्र शेठ घरत यांचे कामगार कधीही ऋण विसरणार नाही व कामगार आणि संघटनेचे जाहीरपणे आभार मानले.
Post a Comment