शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

रस्ता नाही, मृत्यूचा सापळा” – राहुरीत कृती समितीच्या ठाम मागण्या


         जालिंदर आल्हाट 
                   अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी प्रतिनिधी 

गेल्या चार दिवसांत नगर–मनमाड महामार्गावरील भीषण अपघातांमध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. राहुरी बसस्थानकाजवळ जगधने नामक महिलेचा अपघातात दुर्दैवी अंत झाला, एमआयडीसीत नोकरीसाठी अप-डाउन करणारा ज्ञानदेव बलमे (वय 32) यांचा विद्यापीठाजवळ, तसेच सेवानिवृत्त शिक्षक साबळे सर यांचा राहुरी येथील ॲक्सिस बँकजवळ अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर "नगर–मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समिती, राहुरी फॅक्टरी" तर्फे शनी मंदिर येथे तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत महामार्गावरील असुरक्षित स्थितीबाबत चर्चा होऊन, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही ठोस मागण्या करण्याचे ठरविण्यात आले.

प्रमुख मागण्या
1.योजना व माहिती पारदर्शक करणे – नगर–मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीची योजना आणि गटार आराखडा नागरिकांसाठी फ्लेक्स/बोर्डद्वारे जाहीर करावा.
 मार्गात योग्य त्या ठिकाणी भित्ती पत्रके लावण्यात यावे.

2.रस्त्याची डागडुजी – रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत.

3.प्रवासी नागरिकांसाठी विमा – नोकरीसाठी दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा अपघाती विमा काढण्यात यावा.

4.आंदोलनाची सूचना – मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास, येणाऱ्या पाच दिवसात रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल.

5.अपघातग्रस्तांना मदत – मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.

कृती समितीने या मागण्या व इतर मागण्या लेखी स्वरूपात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व तहसीलदार राहुरी यांना निवेदनाद्वारे सादर करण्यात येणार आहे. सदर पार पडलेल्या मीटिंगमध्ये सर्व सदस्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने निस्वार्थपणे लढा द्यावा यासाठी शपथविधी पार पडला.

या बैठकीस वसंत कदम, राजूभाऊ साळवे, संदीप कोठुळे, अ‍ॅड. प्रशांत मुसमाडे, सुनील विश्वासराव, अनिल येवले, आदिनाथ कराळे, प्रशांत मुसमाडे, रवींद्र नालकर, पंकज घोरपडे,  महेश दौंड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post