पंकज सरोदे
प्रतिनिधी
जुने मीटर असताना नवीन मीटर बसवण्याची आवश्यकताच नव्हती तरी नवीन मीटर बसवले घरगुती मीटरचा वापर कमी असतानाही बिल मात्र जास्तीचे येत आहे अशा अनेकांच्या तक्रारी येत आहेत तेव्हा सदर मीटर बसवणे बंद करून वाढीव वीजदर रद्द करण्यात यावे.
महावितरण कडून बारामती विभागामध्ये जुने मीटर चांगले असताना नवीन वीज मीटर सक्तीने बसवण्यात येत आहे. याला लोकांचा विरोध असून देखील चांगले चालत असणारे जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत.
विद्युत कायद्यातील कलम ४७ च्या पाच नुसार मीटर बाबत कोणत्याही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ग्राहकांचाच आहे तसेच विविध नियामक आयोगाचे स्मार्ट प्रीपेड मीटरच्या संदर्भात आलेली २०२४ सालचे नियमावली आणि कर्नाटक उच्च न्यायालयाने २५ एप्रिल २०२५ रोजी कोणत्याही ग्राहकाला त्याच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावता येणार नाही असा आदेश पारित केला आहे.
ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय शासनाचा नाही कुठलाही न्यायालयाचा नाही आणि आयोगाचा नाही उलट नुकतेच कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने २० ग्राहकांच्या पूर्व परवानगीशिवाय मीटर बसवता येणार नाही असे निर्देश दिले आहेत तसेच सक्तीने असे मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास व ज्या ग्राहकांचे मीटर बदललेले आहेत त्यांचे मीटर ८ दिवसांत आहे तसे बसून न दिल्यास बारामती विभागातील ग्राहक व वंचित बहुजन आघाडी यांच्या तर्फे बारामती महावितरण कार्यालयावरती तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा व निवेदन बारामती परिमंडळ महावितरणचे मुख्य अभियंता धरामराज पेटकर साहेब यांना वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राज कुमार यांनी दिला.
प्रमुख मागण्या
बारामती विभागामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवावे.
ज्या ग्राहकांचे जुने मीटर बदलून नवीन बसवण्यात आले आहे त्यांना जुने मीटर आठ दिवसांच्या आत बसून द्यावे.
यावेळी महासचिव सतीश साळवे जिल्हा संपर्कप्रमुख ॲड वैभव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष रणजीत पाडळे, सचिव गोविंद कांबळे, संघटक विश्वनाथ घोडके, कायदेशीर सल्लागार ॲड संतोष कांबळे, सागर गवळी, हनुमंत भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment