शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बोबडे टाकळी सर्कल मधील धारगाव येथे प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीत नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश. -- उपाध्यक्ष भगवान थोरात यांच्या पुढाकारातून पक्ष प्रवेश

           
                पंकज सरोदे
                        पुणे जिल्हा प्रतिनिधी 

     परभणी, दि. ८ सप्टेंबर २०२५ – 
          परभणी तालुक्यातील बोबडे टाकळी सर्कल मधील धार गाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष बांधणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा अध्यक्ष (उत्तर) तुकाराम भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परभणी तालुका अध्यक्ष (उत्तर) प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमात धार गावातील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उत्तम किसनराव थोरात, माणिक विकास थोरात, आनंद किशनराव थोरात, भगवान मारोतराव थोरात, कैलास किसनराव थोरात, तथागत देविदास थोरात, प्रेमराज भगवान थोरात या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे धार गावात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव वाढण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमात तालुका अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी सर्व नव्या कार्यकर्त्यांचा पुष्पहार घालून पक्षात समावेश करून घेतला. पक्षप्रवेश सोहळा यशस्वी करण्यासाठी परभणी तालुका उपाध्यक्ष (उत्तर) भगवान थोरात आणि उपाध्यक्ष शेख कलीम यांनी विशेष परिश्रम घेतले. 



          
       कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, तालुका उपाध्यक्ष भगवान थोरात, तालुका उपाध्यक्ष शेख कलीम, उत्तम किसनराव थोरात, माणिक विकास थोरात, आनंद किशनराव थोरात, भगवान मारोतराव थोरात, कैलास किसनराव थोरात, तथागत देविदास थोरात, प्रेमराज भगवान थोरात, लाकडोबा भोजाजी ताकतोडे, राहुल तुपसमुंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या पक्षप्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला तालुका पातळीवर नवीन ऊर्जा मिळाली असून भविष्यात पक्ष संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.  *प्रमोद अशोकराव अंभोरे*, तालुका अध्यक्ष (उत्तर) परभणी, यांच्या  कार्यक्षेत्रातील 4 सर्कल —1) टाकळी कुंभकर्ण सर्कल, 2) बोबडे टाकळी सर्कल, 3) झरी सर्कल 4) पिंगळी सर्कल  यामध्ये सर्कल प्रमुख व सर्व शाखांचे बांधणी करण्यासंदर्भात दौरे आयोजित कारण्यात येणार आहेत. परभणी तालुक्यातील या 4 ही सर्कलमधील संपूर्ण गावातील शाखा बांधणी करण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी  अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821, उपाध्यक्ष शेख कलीम - 8830768992,  उपाध्यक्ष भगवान थोरात - 9049493687 या नंबर वर संपर्क साधण्याचे आव्हान प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी केलेला आहे .



Post a Comment

Previous Post Next Post