शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

स्वर्गीय शंकरराव पवार प्रतिष्ठान व आरोग्य उपकेंद्र सुगांव बु. ता. मुखेड जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी पूजन आणि मोफत आरोग्य शिबीर संपन्न.....


.                 
                  पुरूषोत्तम सोनखांबे 
                  मुखेड. --  बाराहाळी
   नांदेड  ---   मुखेड वरून - बार्‍हाळी-मुक्रमाबाद प्रतिनिधी-  नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मौजे भवानी तांडा येथे दिनांक 18 आक्टोबर 2025 रोज शनिवार या दिवसी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय शंकरराव पवार प्रतिष्ठान व आरोग्य उपकेंद्र सुगांव बु. यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी पुजन आणि मोफत आरोग्य सेवा शिबीर संपन्न झाले. 
     या शिबिराचे उदघाट्न मुखेड तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर आकाश देशमुख यांनी केले आणि आय. एम. ए. मुखेडचेअध्यक्ष डॉक्टर अशोक कौरवार यांनी अध्यक्ष पद भुषविले. तसेच डॉक्टर रामराव श्रीरामे, डॉ. श्रीहरी बुडगेमवर, डॉ. पांडुरंग श्रीरामे, डॉ. शिवसांब वडेर, डॉ. प्राजक्ता झरीकर, डॉ. प्रिया खंडागळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  नामदेव बोमनवाड, माजी  जिल्हा परिषद सदस्य नांदेडचे दशरथराव लोहबंदे, बाबू पाटील कुंद्राळकर, कुंद्राळ नगरीचे तरुण तडफदार युवक सरपंच  सतिष भालेराव, पंचायत समिती मुखेडचे माजी उपसभापती कल्याणराव पाटील, आखरगा गावचे माजी सरपंच माधवराव होनमाने प्रामुख्याने उपस्थित होते. 
  

   निरंजन डोईफोडे, मारोती पवार, गौराजी वलपवाड, रामू श्रीरामे, गंगाराम जाहिरे, अविनाश राठोड, यांच्यासह सर्व राठोड, पवार, डोईफोडे, वलपवाड मंडळी उपस्थित होते. तसेच पोलीस पाटील किशन पवित्रे, प्रल्हाद आपटे आणि महिला, पुरुष मंडळी आवर्जुन उपस्थित होते.
     या आरोग्य सेवा शिबीराला डॉ. कौरवार आणि दशरथ लोहबंदे यांनी मार्गदर्शन केले.
    

 मुखेड तालुक्यातील,     बाऱ्हाळी सर्कल मधील वाडी तांड्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेसाठी या शिबिराचे खास आयोजन केले होते. यात मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधी वाटप करण्यात आले.
     या शिबिराचे आयोजन स्वर्गीय शंकरराव पवार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पवार बंधुनी केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post