दौंड तालुका प्रतिनिधी
राहू (ता. दौंड, जि. पुणे) /
शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास १ वाजता राहू-मांडवगण मार्गावर एमएच २३ एयू ००४३ या क्रमांकाच्या पिकअप वाहनामध्ये गोवंश तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने तातडीने कारवाई करण्यात आली.
या माहितीच्या आधारे मांडवगण पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, पिकअपच्या मागील बाजूस चार गाई क्रूरपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यापैकी एक गाय मृत अवस्थेत होती. या घटनेनंतर वाहनचालकाची चौकशी करण्यात आली असता, त्याने आपले नाव सोहम टिळे (रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे) असे सांगितले. त्याच्यासोबत असलेल्या ओमकार दशरथ सायकर (रा. राहू, ता. दौंड) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
चालक सोहम टिळे याने चौकशीत सांगितले की, त्या गाई उस्मानाबाद येथे कत्तलीसाठी नेत होते. या तस्करीत सराईत गायींचा दलाल सरदार गोतस्कर याचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
मांडवगण पोलिसांनी वाहन जप्त करून, दोन्ही आरोपींवर कायद्यानुसार प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व चार गाईंना वाचवून बोरमलनाथ गोशाळा, केडगाव चौफुला येथे सुखरूप सोडण्यात आले.
या कारवाईत गोरक्षक गौरव सारवड, मंगेश चिमकुर, विकास शेंडगे, अभि फासोळे, संकल्प पाटोळे, ऋषभ लवटे या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहकार्य केले.
या धाडसी कारवाईबद्दल मांडवगण पोलीस प्रशासनाचे व गोरक्षक बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
“शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार”
Post a Comment