संजय गायकवाड
रायगड जिल्हा उपसंपादक
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आठ व नऊ ऑक्टोबर 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आल्या रोहा तळा महाड माणगाव या तालुक्यांमध्ये बैठकीत स्थानिक स्तरावरील पक्षकार्याच्या सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली बैठका यशस्वीपणे पार पडण्यासाठी रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री सुनील देशमुख तळा तालुका अध्यक्ष श्री शरद भोसले माणगाव तालुका अध्यक्ष श्री विलास सुर्वे आणि महाड तालुका अध्यक्ष श्री उमेश तांबे यांनी आपल्या तालुक्यामध्ये बैठकीचे आयोजन प्रभावी नियोजन केले या दौऱ्या दरम्यान तळा माणगाव आणि महाड येथे काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले
या उद्घाटन कार्यक्रमांना कार्यकर्त्यांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभला तळा तालुक्यातील या कार्यक्रमाच्या निमित्त अनेक नव्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री मिलिंद पाडगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्यासोबत अल्पसंख्याक विभाग रायगड अध्यक्ष अखलाख शिलोत्री. रायगड काँग्रेस उपाध्यक्ष किरीट पाटील. पनवेल ओबीसी सेल अध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह विविध तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठका आणि उद्घाटन कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार आला .
असून आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला आहे महेंद्र शेठ घरत यांचं कार्य रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने चांगल्या पद्धतीने चालू आहे व कामगार नेते म्हणून त्यांची ओळख सुद्धा जगभरात आहे रायगड जिल्ह्यामध्ये महेंद्र शेठ घरत यांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेस जनसंपर्क कार्यालय असावं व ते आता प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळत आहे.
Post a Comment