शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मान.. राहुल खलसे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव


 प्रतिनिधी सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे : मणिभाई मानव सेवा ट्रस्ट"यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती, राष्ट्रीय एकात्मता दिन व भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक कार्यात निस्वार्थी वृत्तीने सातत्याने योगदान देत असलेल्या मांजरी बुद्रुक येथील "विश्वजननी नवरात्र उत्सव ट्रस्ट" चे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपविभाग युवासेना अधिकारी राहुल सुरेश खलसे यांना यंदाचा "भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार २०२२" डॉ. रवींद्र भोळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे प्रदान करण्यात आला. 

        राहुल खलसे यांना शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्याचे आवड असून स्वतः तायक्वांदो तसेच कराटे या क्रीडा प्रकारात तालुका, जिल्हा यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये सुवर्णपदके विजेते असून परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी याच क्रीडा प्रकारांचे मोफत प्रशिक्षणही दिलेले आहे. आपल्या युवा सहकाऱ्यांसोबत राहुल खलसे यांनी आत्तापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य जयंती उत्सव यासह राष्ट्रपुरुषांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव, नवरात्र उ्सव ,पर्यावरण पूरक गणेश विसर्जन, झोपडपट्टी वासियांचे प्रश्न सोडविणे, वाचनालय उपक्रम, पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी खाऊचे वाटप यासह अनेक सामाजिक तसेच धार्मिक उपक्रमातही त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. 

           याच सामाजिक कार्याची दखल घेऊन राहूल खलसे यांना "मणिभाई मानव सेवा ट्रस्ट" यांच्या वतीने सरदार वल्लभाई पटेल जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन व भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देत असल्याने डॉ. रवींद्र भोळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे "भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार 2022 " ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने सन्मानित केल्याने व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्याने मांजरी बुद्रुक परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post