प्रतिनिधी सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शना खाली, इंदापूर तालुका कार्यकर्ता मेळावा, शुक्रवार दि. २८/१०/२०२२ रोजी सावता महाराज मंदिर हाॅल, इंदापूर, या ठिकाणी ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष नरहरी गांजवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज निंबाळकर, समन्वय समिती अध्यक्ष सतिश साकोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य अस्लम तांबोळ, जिल्हा उपाध्यक्ष मारुती पठारे, जिल्हा सचिव सतिश थिटे, जिल्हा कोषाध्यक्ष पोपटराव साठे हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच इंदापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यकर्ता मेळाव्यात इंदापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. हनुमंत वसंत कदम यांची इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.तुकाराम महाराज निंबाळकर यांचे हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा व सर्व कार्यकारिणीचा सन्मान करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ग्राहक कल्याण फाउंडेशनचे कार्य गावोगावी पोहोचवणार असल्याचे हनुमंत कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले. तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे, जाहीर करण्यात आली.
इंदापूर तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशन
अध्यक्ष - हनुमंत वसंत कदम
उपाध्यक्ष - अनिल महाराज मोहीते
सचिव - मोहन महादेव शिंदे
कार्यवाह - संतोष ठकसेन कांबळे
प्रसिद्धीप्रमुख - सुर्यकांत दादू चव्हाण
सदस्य - राजेंद्र नारायण शिंदे
सदस्य - प्रकाश विठ्ठल वाघमोडे
सदस्य - राजेंद्र एकनाथ शिंदे
सदस्य - संतोष बबन खुरंगे
सदस्य - अनंता किसन ठवरे
मार्गदर्शक - राजाराम देवबा राऊत या प्रमाणे तालुका कार्यकारिणी गठीत करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. समन्वय समिती अध्यक्ष सतिश साकोरे यांनी लोकशाही दिनाविषयी सविस्तर माहीती सांगीतली. ग्राहक कल्याण फाउंडेशनचे कार्य व कार्यकर्ता कसा असावा या विषयी ह.भ.प.तुकाराम महाराज निंबाळकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य अस्लम तांबोळी, जिल्हा अध्यक्ष नरहरी गांजवे, उपाध्यक्ष मारुती पठारे, जिल्हा सचिव सतीश थिटे व जिल्हा कार्यकारिणी सदस्य पोपटराव साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. चहापानानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



Post a Comment