शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सिंधू संस्कृती नायक बळीराजा गौरव व स्मरण दिवस साजरा करण्यात आला... हडपसर

                     प्रतिनिधी सुनिल थोरात

                      महाराष्ट्र पोलीस न्यूज



 पुणे (हडपसर) : गांधी चौक येथे सिंधु संस्कृती नायक बळीराजा गौरव साजरा करण्यात आला..... 

      "बळीराजा" च्या प्रतिमेचे पूजन फुले यांचा वैचारिक वारसा जोपासणारे विठ्ठल सातव यांच्या हस्ते संपन्न झाले.

           महेश टेले पाटील यांनी आपल्या मनोगता मध्ये सिंधु संस्कृती नायक बळीराजा यांच्या कार्याचा प्रसार करणे गरजेचे आहे. शेतकरी, कामगार यांना चांगले दिवस येणार नाहीत. पुणे येथे जे पिकतं ते जगामध्ये विकते अशे बोलले जाते.

         त्यानुसार हडपसरच्या गांधी चौकातचे पेरतो ते पुण्यामध्ये उगवते कारण हडपसर हि पुरोगामी विचारांची भूमी आहे. यामुळे आपल्या सर्व पुरोगामी लोकांनी एकत्रित येऊन हे विचार सर्वापर्यंत पोहचविणे आपले कर्तव्य आहे.

        यावेळी विठ्ठल सातव, साधना शिंदे, महेंद्र बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमजान शेख, भूमिका विवेक तुपे सरदार, यांनी व समारोप डॉ किशोर शहाणे यांनी मानले... 

        यावेळी विठ्ठल सातव, शिवश्री महेश तेळे, (संस्थापक अध्यक्ष मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान), बापू तुपे (चितपट निर्माते), महेद्र तात्या बनकर (शिवसेना नेते), शिवश्री उत्तम बापू कामठे (जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे), डॉ_किशोर शहाणे (संस्थापक अध्यक्ष माय माथाडी कामगार संघटना), वामन धडवे (अध्यक्ष सत्यशील सामाजिक संस्था), दिलीप गायकवाड (नेते आप), साधना शिंदे (सामाजिक कार्यकर्त्यां), शिवश्री रघुवीर तुपे (जिल्हा कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ पुणे), शिवश्री रमजान शेख (संभाजी ब्रिगेड पुणे), शिवश्री विवेक तुपे सरदार (जिल्हा कोषाध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे), पितांबर धीवर (जनकल्याण विचार मंच), आयुब भाई पठाण (संस्थापक अध्यक्ष शिवराज्य वाहन), वाघाळे बी. एम.सर, हरिश देडगे (सामाजिक कार्यकर्ते), जयप्रकाश जाधव सर,..इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते...... 

          आजही बळीराजा म्हटलं की आपलं काहीतरी आहे असं वाटतं. बळीराजा हा शेतकर्‍यांचा राजा होता म्हणून तर आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका अत्यंत गुणी राजाचं स्मरण आजही होतेय हे आपण बघतच आहोत त्यामध्ये बहीण भावाला ओवाळताना भावाला शुभेच्छा देण्याच्या हेतूनं ती म्हणते की, ‘ईडा_पिडा_टळो_आणि_बळीराजाचं_राज्य_येवो’. भावाला ओवाळताना बहीणीनं केलेलं बळीराजाचं स्मरण हे एक प्रकारच्या उत्स्फूर्त कृतज्ञतेचं उदाहरण म्हटलं पाहीजे.

Post a Comment

Previous Post Next Post