शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

'...तो मर्द कसला", शहाजी पाटलांच्या , 'त्या' वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची टोलेबाजी;

विशेष (प्रतिनिधी) 

महाराष्ट्र पोलीस न्यूज



 त्यांनी अनेकदा भाषणात त्यांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती सांगितली आहे. "आपल्या बायकोला साडी घ्यायलाही पैसे नव्हते" या त्यांच्या वक्तव्यावरुन बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पाटलांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. "आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला", असा खोचक , टोला खडसे यांनी पाटलांना लगावला आहे. शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यानंतर सुधारली असल्याचंही खडसे यांनी म्हटलं शहाजी बापू यांनी हे कोणत्या हेतूनं म्हटलं मला माहित नाही. हे विधान त्यांनी कदाचित गंमतीनं किंवा उद्वेगानं केलं असेल. आता त्यांना पैशांसाठी कुणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता भासल्याचे दिसत नाही", असे खडसे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याकडे शरद पवारांनी लक्ष दिलं नसल्याचंही खडसे यांनी सांगितलं आहे.

        "काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल " हा डायलॉग प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक ठिकाणी शहाजी बापू पाटील यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. "खूप गरीबीत राहत आहे. किती दिवस झाले, बायकोला साडीही घेऊ शकलो नाही", असं वक्तव्य एका मुलाखती दरम्यान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा महाविकास आघाडीकडून चांगलाच समाचार घेण्यात आला होता. शहाजी बापू पाटलांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडी कडून साडी देखील पाठवण्यात आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post