शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राजे क्लबच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन शेवाळेवाडी : माजी उपसरपंच अमीत पवार

प्रतिनिधी (सुनिल थोरात) 

महाराष्ट्र पोलीस न्यूज



 पुणे (हवेली) :  मांजरी बुद्रुक : दीपावलीत पाडवा व भाऊबीजेच्या औचित्य साधून राजे क्लबच्या वतीने सालाबाद प्रमाणे हनुमान मंदिर शेवाळेवाडी येथे दिपोस्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      महाराजांची रेखीव रांगोळी, फुलांची सजावट व दिव्यांच्या रोषणाईने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. या कार्यक्रमासाठी मांजरी बुद्रुक व शेवाळेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 

      यावेळी मांजरी बुद्रुक गावचे माजी सरपंच शिवराज घुले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष भारतीताई शेवाळे, मांजरी गावचे माजी उपसरपंच प्रमोद कोद्रे, योगिता घुले, हेमलता पडवळकर, माधुरी मोरे, दीपक ढोरे, आकाश पवार, रवी गोगड, अशोक धोंडगे, सुरेश गवळी, अरुण चव्हाण, संतोष भंडारी, प्रा. विजय सोनवणे, नागराज कुंदन, सोमनाथ बागवे, अंजना शेवाळे, अमित शेवाळे, बबन जगताप, संतोष कदम, राहुल भापकर, सचिन भापकर,  महेश भंडारी, मोहसीन आतार,विष्णू शिंदे, विक्रम कापरे, मंगेश रसाळ, वैभव चव्हाण, अमर भापकर, रोहित तुपे आदी उपस्थित होते. 

             दरवर्षी आप्तेष्ट, मित्र मंडळी व शेवाळेवाडी परिसरातील नागरिकां समवेत या कार्यक्रमा निमित्ताने एकत्र येत दिवाळी साजरी केल्याने आनंद द्विगुणित होतो असे माजी. उपसरपंच व राजे क्लबचे संस्थपाक अध्यक्ष अमित पवार म्हणाले.

        रांगोळी व फुलांची सजावट अर्चना पवार, फाल्गुनी पडवळकर, अंकिता पवार, प्रांजल सुर्वे, दिशा चौधरी, संजू पडवळकर, सागर नाटिकर, विराज बोडके व आर्यन पवार  यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post