प्रतिनिधी (हवेली)
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (हडपसर) : शेवाळेवाडी गावच्या पोलीस पाटील अमृता अलंकार खेडेकर यांच्या वतीने हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता फिल्ड ऑफिसर विक्रम लहाने यांना निवेदन दिले.
परतीच्या पावसात हडपसर सोलापूर रोडवर शेवाळेवाडी येथील स्टड फार्म जवळ पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेच्या वतीने रोडच्या मध्यभागी दुभाजक तोडून पावसाचे पाणी जाण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली. त्यामुळे रोडवर उंचवटा तयार निर्माण झाला. हाच उंचवटा (स्पीड ब्रेकर) तयार झाला असल्याने रात्री च्या वेळी तो दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. स्पीड ब्रेकर च्या अलीकडे दिशा दर्शक बोर्ड व याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता विक्रम लहाने यांना शेवाळेवाडीच्या पोलीस पाटील अमृता खेडेकर, उद्योजक शामराव यादव व अलंकार खेडेकर यांनी निवेदन दिले.

Post a Comment