विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस न्यूज
लातूर : सबका साथ सबका विकास, डिजिटल इंडिया असा नारा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदय एकीकडे देत असताना लातूर मध्ये चाललय तरी काय...
लातूर जिल्ह्यात मागील वीस वर्षांपासून अनेक अवैध धंद्याचे साम्राज्य उग्र रूप धारण केले आहे, शहरात, गलोगली, ग्रामीण भागातील अनेक गावगावात अवैध मद्य विक्री, सुगंधित मावा गुटखा, ऑनलाईन लॉटरी, मटका, अवैध वाळू उपसा करून साठवून ठेवणे, वीटभट्टी, खडी केंद्र यासारख्या अनेक अवैध धंद्यानी थैमान घातले असून, स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाचे करोडो रुपयांचा महसूल प्रशासनाच्या तिजोरीत जमा न होता शहरातील स्थानिक पोलिसांच्या खिशात जात असल्याचे नागरीकाद्वारे बोलले जाते आहे.
अवैध धंद्ये करणार्या बरोबर हातमिळवणी करून प्रशासनातील अधिकारी आपली पोळी भाजून मलिदा चाखत असतानाचे चित्र सध्या शहरात सर्रास पहावयास मिळते. अवैध धंद्यांन विरोधात पोलीस कार्यवाही करत नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. अवैध धंद्यांन विरोधात कारवाई झाली तरी "मी करतो मारल्यासारखे तू कर रडल्या सारखे" अशा प्रकारे कारवाई झाल्याचे चित्र पाहायला मिळाल्याचे नागरिक एकांतात कुजबुज करत आहेत.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. जनतेच्या आरोग्याशी हा खेळ खेळण्यात सदर अवैध धंदेवाले व कारवाई करणारे एकमेकात रमुन जात आहेत.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी आपल्या ईलेक्ट्रॉनिक मिडिया, वृत पत्राद्वारे अवैध धंद्याची बातमी प्रकाशित केली असता, उलट पत्रकारांनाच संबधित अधिकारी यांच्या व्दारे दमदाटी करण्यात येत आहे.
त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी होत असलेले अवैध धंदे व जाणून बुजून या अवैध धंदेवाल्याना पाठीशी घालनारे संबंधित अधिकारी आणि शहरातील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांची वरिष्ठांनी कारवाई करावी किंवा संबंधित असलेल्याची तात्काळ बदली करण्यात यावी.
अशी मागणी आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या वतीने राष्ट्रपती केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, मुख्य संचालक, प्रधान आयुक्त, केंद्रीय दक्षता आयोग, महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना ही माहिती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष विशाल सुर्यवंशी, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य हे अवैध धंद्याला वरद हस्त कोणाचा यासाठी पाठपुरावा करणार आहेत.



Post a Comment