विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्राच्या वतीने दिनांक ४ व ५ नोव्हेंबर २००२२ रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी 'राष्ट्रवादी मंथन' 'वेध भविष्याचा' या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
सध्या देशात धर्मांध शक्ती वाढत आहे. सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जात आहे. फॉक्सकॉन, एअरबस यांसारखे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर जात आहेत. राज्यातील तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे. शेतकरी ओल्या दुष्काळाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत आपण जनतेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थिती संदर्भातील आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेता यावा, राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. ही मोहीम गतिमान करून ग्रामीण तसेच शहरी भागात कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे निर्माण करण्यात येत असून शिबिराच्या माध्यमातून या मोहिमेला अधिक चालना देण्यात येणार आहे. असे माजी जल संपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेऊन माहिती दिली

Post a Comment