शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

दिवाळी निमित्ताने एकत्र आलेले मित्र .. मित्राला केली आर्थिक मदत......


 महाराष्ट्र पोलीस न्यूज


सोलापूर माळीनगर : माॅडेल हायस्कूल माळीनगर, 1998 दहावी २००० -१२ वी सायन्स, आर्टस् बॅचं, शाळा, कॉलेज नंतर सर्व मित्र नोकरीं निमित्ताने महाराष्ट्र च्या वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाले. यातील तर काही मित्र परदेशात म्हणजे केनिया, कतार, सिंगापूर सारख्या ठिकाणी नोकरीं निमित्ताने स्थायिक झाले. 

          कोरिया नंतर येणाऱ्या दिवाळीत यावर्षी सर्वजण एकत्र येणार म्हणून व्हाट्सअप ग्रुप वर अगोदर महिन्या पासून प्लॅनिंग चालू होते. या ग्रुप मधील एक मित्र  मेजर किरण शिंदे आर्मी मध्ये असतात सुट्टी ला येणार म्हणून त्या निमित्त त्यांच्या फार्म वर सर्व जण बऱ्याच दिवसांनी भेटले. तो दिवस छान वातावरणात सर्वानी एकत्र घालवला जुन्या आठवणी ना उजाळा दिला.

            या भेटी दरम्यान आपलाच एक मित्र प्रीतम पवार चार वर्षांपूर्वी एका अपघातात गंभीर जखमी झाला. तो गेल्या चार वर्षा पासून कोमात असून  अंथरुणात पडून आहे. घरची परिस्थिती मध्यम असली तरी आता पर्यंत बराच खर्च हॉस्पिटलला आला होता. येणाऱ्या अडचणीनां तोंड देत आहेत. एवढी माहिती मिळाल्या नंतर सर्वांनी मिळून ज्याला जमेल त्या परीने एका दिवसात रोख रक्कम ५० हजार जमा करून त्याच्या घरी जाऊन भेट घेऊन छोटी मदत म्हणून वडिलांन कडे सोपवली. तसेच मेडिकल औषधे, सरकारी खात्यात असणाऱ्या मित्रांनी शासकीय योजनाचा लाभ मिळण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन  दिले. सर्व मित्रांनी दिलेली अनपेक्षित भेट पाहून घरचे सर्व भावुक झाले होते. सर्वांनी दिलेली छोटीशी  मदत आधार पाहून वडिलांनचे डोळे पाणावले होते. 



         आपला मित्र लवकरच  बरा होईल ही अशी आशा मनाशी बाळगून एक अनोखी दिवाळी साजरी केली, प्रत्येक मित्रा ची छाती गर्वाने भरून आली होती. प्रत्येकाने आपल्या कुटुंब व मुलांन समोर एक आदर्श निर्माण करून सर्वजण आपल्या आपल्या मार्गी मार्गस्त झाले.

              या वेळी मॉडेल हायस्कूल चे माजी प्राचार्य कुंभार सर, सोनावणे सर उपस्थित होते. कुंभार सरांनी सर्व मित्र परिवार चे कौतुक केले. या विषयाची चर्चा सर्व अकलूज, माळीनगर  परिसरात चालू आहे.. बातमी द्यायला मित्रानं नको वाटतं असले तरी...... प्रसिद्धी नाही पण पुढे येणाऱ्या पिढीला एक आगळा वेगळा संदेश......

Post a Comment

Previous Post Next Post