सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. हवेली) : लोणीकाळभोर पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये (दि. २२) रोजी संध्याकाळी ऊरुळीकांचन परीसरामध्ये सहा दराडेखोरांनी एका चायनीस हॉटेलवर प्राणघातक हत्यारानीशी दरोडा टाकुन हॉटेल मालकास मारहाण करुन त्याच्या गल्यामधील रोख रक्कम लंपास करुन फरार झाले होते.
हॉटेल मालक अजिंक्य सतिश कांचन रा. दत्त नगर ऊरुळीकांचन पुणे यांचे फिर्यादी वरुन सहा दरोडेखोरांच्या विरोधामध्ये लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे यथे गु र नं ५९८ / २०२२ भा. द. वि. कलम ३९७, ३२३, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार कायदा क. ४ (२५), म.पो.का. कलम ३७ (१) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेनमेंट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व फरार आरोपीतांनी सदर भागामध्ये दहशत पसरवल्यामुळे लोणी काळभोर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तपास पथकातील पोउपनि अमित गोरे व पोलीस अंमलदार यांना तपासाच्या सूचना केल्या.
त्या अनुशंगाने फरार आरोपीतांचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार निखील पवार यांना त्याचे बातमीदारा मार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपी हे हांडेवाडी रोड येथील भारत पेट्रोल पंपाचे पाठीमागे असलेल्या एका बंद गोडावून मध्ये लपुन बसले आहेत. अशी बातमी मिळाल्यावरुन पोउपनि गोरे यांना कळवले असता त्यांनी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती कळाल्यानंतर बातमीची खात्री करून कारवाई करण्यासाठी पोहवा गायकवाड, पोहचा पाटोळे, पोना नागलोत, पोना देविकर, पो ना जाधव, पोशि कुदळे, पोशि पवार पोशि पुंडे, पोशि सोनवणे यांना सुचना केल्या.
तपास पथकातील स्टाफ पकडण्यासाठी गेले असता त्यांना चाहुल लागल्याने ते तेथुन पळुन जावु लागले, तेव्हा त्यांचा पाठलाग करुन त्यांना थोडयाच अंतरावर शिताफीने पकडले. पकडलेल्या इसमांस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्यांचे नाव व पत्ता (१) सुमित ऊर्फ विलास दत्ता खवळे, वय १६ वर्षे, रा. बँक ऑफ बडोदाचे पाठीमागे, सासवड रोड, सातवाडी, हडपसर, पुणे (२) रोहन राजकुमार गायकवाड, वय १७ वर्षे, रा. कुडके हाईटस समोर, गोंधळेनगर, हडपसर, पुणे, मुळ रा. गंगापुर, उदगीर जि. लातूर (३) करण संदीप चिकणे, वय १९ वर्षे, धंदा-मजुरी, रा. सरस्वती क्लास समोर, सातवाडी, राहुल कॉलनी, हडपसर, पुणे, मुळ रा. पारगाव मेमाणे ता. पुरंदर जि. पुणे ( ४ ) हनुमंत सोपान हाके, वय १७ वर्षे, रा. सरस्वती क्लास समोर, सातवाडी, राहुल कॉलनी, हडपसर, मुळ रा. वरळे गाव ता.सोलापुर जि. सोलापुर (५) समाधान वैजनाथ बाबळसुरे, वय-२० वर्षे, धंदा मजुरी, रा. घर नं १२ नटराज कॉलनी, गोंधळेनगर, हडपसर, पुणे, मुळ रा. बाजार पेठाचे पाठीमागे, किल्लारी, ता. औसा जि.लातुर (६) अनिकेत गुलाब यादव वय १९ वर्षे रा. पठारेवस्ती लोणीकाळभोर पुणे असे असल्याचे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन पोलीस तपासामध्ये त्यांचे कडुन अजुन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि धायगुडे, लोणी काळभोर पो स्टे पुणे हे करत आहेत.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. विक्रांत देशमुख पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ - ५, मा. बजरंग देसाई, सहा पोलीस आयुक्त हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि अमित गोरे व त्यांचे सोवत पोहवा नितीन गायकवाड, पोहचा आनंद पाटोळे, पोना सुनिल नागलोत, पो ना श्रीनाथ जाधव, पोशि नितेश पुंडे, पोशि शैलेश कुदळे, पोशि निखील पवार, पोशि दिपक सोनवणे, पोशि वीर यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment