शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण : २० दिवसात कारवाई करू या अटीवर उपोषण मागे__


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. इंदापूर) : पंचायत समिती इंदापूरचे भ्रष्ट गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. याकरिता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे वंचित बहुजन आघाडी चे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

           इंदापूर येथील कालठण नं १ येथे बदली होऊन इतर ठिकाणच्या ग्रामपंचायत कडे रुजू झालेले ग्रामसेवक हनुमंत पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या विविध विकास कामात गैरव्यवहार केला असल्याने  यांच्यावर कारवाई करण्यासाठी दिनांक १४/१०/२०२१ ते २४/११/२०२२ पर्यंत गटविकास अधिकारी पंचायत समिती, इंदापूर  यांच्याकडे वेळोवेळी केलेला पत्रव्यवहार यांचा कार्यकाळ जवळ जवळ एक वर्ष पूर्ण होऊन ही वरती काही दिवस झाले आहे. तरी देखील त्यांनी कोणतीही कारवाई / कार्यवाई  केली नाही. त्यामुळे अशा भ्रष्टअधिकाऱ्याला पाठीशी घालून  इंदापूर पंचायत समितीचे अकार्यक्षम गटविकास अधिकारी यांनीच संघनमताने व साखळी पद्धतीने भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचाराचे समर्थन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

       यामुळे संबंधित प्रकरणातील गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर  कायदेशीर कारवाई करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर तालुका संपर्क प्रमुख सिद्धार्थ साळवे यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात केले. 

         यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक हनुमंत तात्या कांबळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मनीषा चंदनशिवे, गयाताई मोरे, सूनिता चंदनशिवे, सागर चंदनशिवे, प्रमोद चव्हाण हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post