सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (पाषाण) : पुणे जिल्ह्यातील पाषाण परिसरातील सुतारवाडी येथील घटनेने गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
शिकवणीला आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा चित्रकला शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पाषाण (पुणे) सुतारवाडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नीलेश नानासाहेब पवार (वय ४९, रा. भगवतीनगर, सुतारवाडी रस्ता, पाषाण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी एका महाविद्यालयात तिच्या आई-वडिलांनी चित्रकलेच्या अकरावीत आहे. तिला चित्रकलेची आवड आहे. प्रशिक्षणासाठी आरोपी नीलेश पवार याच्याकडे पाठविले होते. आरोपी पवार पिडीत मुलीला चित्रकलेचे प्रशिक्षण देत होता. आरोपी पवार याने पीडित अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे केले. त्यानंतर विद्यार्थिनी घरी गेल्यानंतर आई- वडिलांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुस्कान या संस्थेमार्फत पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली.
त्यानुसार आरोपी नीलेश पवार यांच्याविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच, चतु:शृंगी पोलिसांनी आरोपी नीलेश पवार याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव करत आहेत.

Post a Comment