सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. हवेली) : छ्त्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोशारी यांच्या विरोधात हडपसर विधानसभात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
राज्यपाल भगतसिंग कोशारी व भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमा घोड्याच्या टाचेखाली तूडवून शिवसेना हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
हडपसर उड्डाणपुलाखाली जिजामाता चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. कोशारी व त्रिवेदी यांच्या हकाल पट्टीची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी माजी आमदार महादेव बाबर यावेळी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, शहर उपप्रमुख समीर तुपे, उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, विद्या होडे, अजय सकपाळ, अमर कामठे, स्वप्नील वसवे, राहुल खलसे, बाळासाहेब खरोसे, संतोष होडे, किरण जाधव, अमित कांबळे, यश तुपे, प्रवीण रणदिवे, नूरजहाँ मुल्ला,वासंती शिरसागर, दिलीप व्यवहारे, कुणाल लोणकर, रमेश क्षीरसागर, विवेक तुपे, मारूती ननावरे, सतिश गोते, शहाबाज पंजाबी, फारूख चांदमलिक आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भाजपाचे सतिश भिसे देखील उपस्थित राहून त्यांनी मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केला.



Post a Comment