सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : लायन्स तर्फे पुणे शहरासोत जगात जे सामाजिक कार्य केले जात आहे ते एक लायन्स सारखे आहे. असे प्रतिपादन डॉ.कांतिलाल संचेती यानी केले. लायन्स क्लब्स ऑफ पुणे २१ सेंचुरी तर्फे आयोजित १९ वा लायन्स वर्ल्ड डायबेटीस जागरूकता आणि अवयव दान कार्यक्रमात ते बोलत होते.
मधुमेह या आजाराबद्दल जनजागृती अभियानांतर्गत आज १८ नोव्होंबर रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर मधुमेह आजारापासून घ्यावयाची काळजी, योगा, आदीचे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यावेळी समाजरत्न पुरस्कार लायन्स नरेंद्र भंडारी, समाज मित्र पुरस्कार लायन्स डॉ. एकनाथ गोंडकर, डॉ. मंदार देव, आणि दिव्य ज्योती पुरस्कार कॅमेलिया पटनायक यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. चंद्रहास शेट्टी मुख्य संयोजक (लायन्स प्रांतपाल (२०१६-१७) आणि महाराष्ट्र अवयव दान प्रमुख ) डॉ. हर्षल एक्तपुरे, लायन्स प्रेमचंद बाफना, डॉ. शितल महाजन, लायन्स सुनिल चेकर, सहसंयोजक लायन- शाम खंडेलवाल, सहसंयोजक लायन- सतीश राजहंस, संघटक सचिव लायन - बलविंदरसिंग राणा, संघटक सचिव लायन - विठ्ठल कुटे, शरद पवार, विकास मुळे आदी उपस्थित होते.
लायन्स क्लब्स मित्र परिवार, लायन्स क्लब्स ऑफ पुणे 21 सेंचुरी, पॅटरॉन क्लब, पार्टिसिपटिंग क्लब, एन.एम. वाडिया हॉस्पिटल, स्काय क्लिनिक, सेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल हॉस्पिटल, पतित पावन संघटना, पुणे शहर यांच्या पुढाकाराने हे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे स्टॉल्सच्या प्रदर्शनातून मधुमेह, रक्तातील साखरेची तपासणी, डोळ्यांची तपासणी, प्रतिबंध किंवा व्यवस्थापित करण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला.


Post a Comment