शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

ग्राहकाला मारहाण व दहशत करून दुकानातील २५०० हजार लंपास : उरुळी कांचन येथील घटना______


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. हवेली) : दि. २२/११/ रोजी १८:३० वाजता लकी चायनीज सेंटर, शिंडवणे रोड, उरुळी कांचन येथे काही अज्ञात इसमांनी हातात प्राणघातक हत्यारानिशी येऊन धमकावून तसेच दुकानातील ग्राहकाला मारहाण करून दहशत निर्माण करून दुकानातील 2500/ रू रोक रक्कम लुटून नेली आहे. 

           त्याबाबत अजिंक्य सतीश कांचन, रा. उरुळी कांचन, ता हवेली, जि. पुणे यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे लोणी काळभोर पो स्टे येथे गु र न ५९८/२०२२ भा द वी ३९७, ३२३, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), मुंबई पोलिस कायदा कलम ३७(१) सह १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 

         दाखल गव्हाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदरशनाखाली तपास पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी नमूद गुन्ह्यात 1) सुमित दत्ता खवले, रा. सातववाडी, हडपसर, पुणे. 2) करण संदीप चिकाने, रा, सतववडी, हडपसर, पुणे 3) रोहन राजकुमार गायकवाड, रा. गोंधलेनगर, हडपसर. पुणे. 4) अनिकेत गुलाब गायकवाड, रा. कडमवाक वस्ती, लोणी काळभोर.पुणे 5) समाधान वैजनाथ बाबळसुरे, रा गोंधलेनगर, हडपसर पुणे 6) हनुमंत सोपान हाक्के, रा सातववाडी, हडपसर,पुणे.

यांना ताब्यात घेतले असून ताब्यात घेतलेल्या आरोपी कडून अशा प्रकारच्या अजून काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याने पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post