शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अनधिकृतपणे केलेल्या पार्कीगचा जेष्ठ नागरिकांना त्रास : खराडी


 सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज

पुणे (ता. हवेली) : अनधिकृत वाहनाचा परिसरातील जेष्ठ नागरिकांना आणि महिलांना मनस्ताप नागरिकांचा रोष__
          दि.२१/११/१०२२ रोजी खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पणे वाहने पार्कींग केली जातात. त्यामुळे त्या परिसरातील सोसायटीच्या नागरिकांना विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला व लहान मुले यांना ये-जा करण्यास खुप त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी खराडी जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित गाडी मालक व चालक यांच्याशी चर्चा करून त्याठिकाणी गाड्या न लावण्याच्या सूचना केल्या आहेत. गाड्या पार्कींग केल्यास अथवा नागरिकांशी हुज्जत घातल्यास संघटनेच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल केली जाईल असा समज /इशारा देण्यात आला.
           यावेळी मोठया प्रमाणात परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावर  स्थानिक पोलीसांना लक्ष घालण्यास  जेष्ठ नागरिक यांच्या वतीने विनंती अथवा निवेदन देण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post