सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या डॉ. नितीन घोरपडे यांना प्राचार्य मतदारसंघ अधिसभा निवडणूकीत घवघवीत यश संपन्न केले.
विद्यापीठामध्ये सर्व वित्तीय अर्थसकंल्पीय विनियोजनांकरिता, शैक्षणिक कार्यक्रमांच्या बाबतीत सामाजिक परिणामांची माहिती देण्याकरिता अधिसभा हे एक महत्त्वाचे प्राधिकरण असून अधिसभेच्या जांगासाठी झालेल्या प्राचार्य मतदारसंघ अधिसभा निवडणूकीत खुल्या गटामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अणासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांना दणदणीत विजय मिळाला.
एकूण २९८ मतदानापैकी ७ मते बाद झाल्याने २७७ पैकी ४७ इतका कोटा या मतदानासाठी होता. डॉ. नितीन घोरपडे पहिल्या फेरीमध्ये प्रथम पसंतीची ४७ मते मिळवून विजयी झाले. प्राचार्य नितीन घोरपडे यांना शिक्षण क्षेत्रातील ३० वर्षांचा अनुभव असून त्यापैकी १५ वर्षे प्राध्यापक तर १५ वर्षे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यांचे संशोधनाचे कार्यही मोठे असून आत्तापर्यंत चार संशोधन प्रकल्प पूर्ण केलेेले आहे. आत्ता पर्यंत त्यांनी १०विद्याथ्यांना पी. एचडीसाठी तर ८ विद्याथ्यांना एम.फील साठी मार्गदर्शन केले आहे. विविध विषयावरील २२ पुस्तकांचे लेखन, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील ३५ शोधनिबंध, वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये ४५ लेख प्रसिध्द असा लेखनाचा अनुभव त्यांच्या गाठी असून ते राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणपव परिषद समितीवर सदस्य म्हणून काम करतात. महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करीत असताना कार्यक्रम, शिबीरे, चर्चासत्र यांचे आयोजन, विद्यार्थी वाढीसाठी प्रयत्न, संशोधन केंद्र, विविध विषय असा महाविद्यालयाचा विस्तार, महाविद्यालयाच्या कायम संलग्नीकरणासाठी प्रयत्न, विविध संस्थांकडून अनुदानासाठी प्रयत्न असे भरीव कार्य त्यांनी आतापर्यंत केलेले आहे. भविष्यातही महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, परिसर, समाज यांना एकत्र घेउन काम करण्याचा प्रयत्न राहील असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांच्या या विजयाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य विरोधी पक्षनेता मा. अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले. संस्थेचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव मा. एल. एम. पवार मा. सहसचिव मा. ए. एम. जाधव यांनी डॉ. नितीन घोरपडे यांचे अभिनंदन केले.

Post a Comment