शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

साखरी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद : विवीध मुद्यांवर चर्चा__


 भाऊ वैजल

महाराष्ट्र पोलीस न्यूज


        पालघर (ता.मोखाडा) : साखरी ग्रामपंचायतीत ग्रामसभा (दि.29) रोजी पार पडली. यावेळी नागरिकांची गर्दी असल्याचे पहायला मिळाले. 

        या ग्रामसभेच्या अजेंड्या प्रमाणे असलेल्या अनेक विषयावर चर्चा झाली करण्यात आली. सन २०२३ - २४ सालाकरिता मनरेगा मुख्य आराखडा तयार करणे. आमचा गाव आमचा विकास (GPDP) 2023-24 चा आराखडा तयार करणे. सर्वांच्या मते ठराव करण्यात आला.

          या वेळी सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामपंचायती तर्फे सहकार्य केले. जाणार असल्याचेही आश्वासन सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच यांनी दिले.

       यावेळी ग्रामसेवक अहिरे, सरपंच प्रकाश भोंडवे, उपसरपंच प्रकाश पाटेकर, सदस्य प्रेमलता भवारी, सदस्य विलास पाटील, सदस्य सुरेखा पाटील, सदस्य शिवराम धांगडे, सदस्य सुवर्णा दांडेकर,सदस्य दत्तू धोंडगा, सदस्य मंगी दिघा, सदस्य वंदना गोविंद, सदस्य व मोठ्या संख्येने जनतेची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post